मुंबईत संजय राऊतांविरुद्ध शिंदे गट आक्रमक, प्रतिमेला "जोडे मारो' आंदोलन

By मनोहर कुंभेजकर | Published: February 23, 2023 12:49 PM2023-02-23T12:49:31+5:302023-02-23T12:49:44+5:30

कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार व युवा नेते डॉ. श्रीकांत शिंदे यांसारख्या उच्च शिक्षीत खासदारांवर बेछूट आरोप करणे म्हणजे संजय राऊत यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे

Shinde group aggressive against Sanjay Raut in mumbai, 'Jode Maro' movement | मुंबईत संजय राऊतांविरुद्ध शिंदे गट आक्रमक, प्रतिमेला "जोडे मारो' आंदोलन

मुंबईत संजय राऊतांविरुद्ध शिंदे गट आक्रमक, प्रतिमेला "जोडे मारो' आंदोलन

googlenewsNext

मुंबई - बेताल वक्तव्य करणारे खासदार म्हणत संजय राऊत यांच्याविरोधात मुंबईच्या प्रत्येक विभागात शिंदे गटाचे विभागप्रमुखं आज मोर्चे काढणार आहेत. त्यात्या पोलिस स्टेशनला तक्रारी नोंदवा असे आदेशही शिंदे गटाच्या विभागप्रमुखांना दिले आहेत. मागाठाणेचे शिवसेना आमदार व विभागप्रमुख प्रकाश सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली मागाठाणे विधांनसभा क्षेत्रात दहिसर पूर्व गोकुळ आनंद येथे आज सकाळी शिवसेनेच्या उपनेत्या व प्रवक्त्या शीतल म्हात्रे, युवासेना कार्यकारणी सदस्य राज प्रकाश सुर्वे व महिला  विभागसंघटक मीना पानमंद यांच्यासह शेकडो शिवसैनिकांनी विभाग क्रमांक 1 तर्फे संजय राऊत यांविरोधात निषेध मोर्चा काढून "जोडो मारो" आंदोलन केले.

कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार व युवा नेते डॉ. श्रीकांत शिंदे यांसारख्या उच्च शिक्षीत खासदारांवर बेछूट आरोप करणे म्हणजे संजय राऊत यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. त्यांच्या सारख्या खासदाराला रोज नवे बेछूट आरोप व कथित वक्तव्य करणे शोभते काय असा सवाल शीतल म्हात्रे यांनी उपस्थित केला. त्यामुळेच, राऊत यांचा निषेध करण्यासाठी मागाठाणेत सदर आंदोलन छेडण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

संजय राऊत यांच्या विरोधात दहिसर पोलिस ठाण्यात  तक्रार नोंदवली आहे. तसेच मुंबईच्या प्रत्येक विभागात आणि राज्यात ठिकठिकाणी विभागप्रमुखं मोर्चे काढणार असून त्यात्या पोलिस स्टेशनला त्यांविरोधात तक्रारी नोंदवणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

Web Title: Shinde group aggressive against Sanjay Raut in mumbai, 'Jode Maro' movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.