Join us

दोन शिवसेना...ते वर्धापन दिन का साजरा करतायेत?; शीतल म्हात्रेंचा ठाकरे गटावर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2023 3:44 PM

शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी शिवसेनेच्या वर्धापनदिनावरुन ठाकरे गटावर टीका केली आहे.

मुंबई: शिवसेनेचा आज ५७वा वर्धापनदिन आहे. शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन वर्धापन दिन साजरे करण्यात येणार आहेत. शिंदेंच्या शिवसेनेनं मुंबईतील नेस्को सेंटरमध्ये भव्य मेळावा आयोजित केला आहे. तर ठाकरे गटाचा मेळावा षण्मुखानंद हॉलमध्ये पार पडणार आहे. या कार्यक्रमाआधी शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी माध्यमांशी संवाद साधत ठाकरे गटावर निशाणा साधला आहे. 

दोन शिवसेना कोण? ते वर्धापन दिन का साजरा करत आहेत?, असा सवाल शीतल म्हात्रे यांनी उपस्थित केला आहे. तसेच खऱ्या शिवसेनेकडून वर्धापन दिनानिमित्ताने जय्यत तयारी करण्यात आलेली आहे, असं शीतल म्हात्रेंनी सांगितले. गद्दार...खोके याशिवाय त्यांना काय येतं. त्यांना गद्दार दिवस साजरा करु द्या, पण आत्मपरीक्षण करण्याची देखील त्यांना गरज असल्याचं शीतल म्हात्रेंनी म्हटलं.

शीतल म्हात्रे म्हणाल्या की, खासदार संजय राऊत आणि मंत्री आदित्य ठाकरे यांनी आत्मपरीक्षण करावं. तुम्ही गद्दार आहात आम्ही नाही. आम्ही आताही शिवसेनेत आहोत. त्यांनी स्वतःचा गटाची कॉमेडी सर्कस करून घेतली आहे. मानसिक संतुलन बिघडलेले लोक असं म्हणतायत की, खोके आणि फाईल्स मान्य करून घेण्यासाठी प्रवेश होतायत.लोकांना विकास हवा आहे. एकनाथ शिंदे लोकांची कामं करतायत. म्हणून लोक पक्षात प्रवेश करत असल्याचं शीतल म्हात्रे यांनी यावेळी सांगितलं.

दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाच्या विधान परिषदेच्या आमदार मनीषा कायंदे यांनी रविवारी रात्री शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी ठाण्यातील आनंदाश्रम येथे शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. गेल्या वर्षभरात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात होत असलेला बदल आणि त्यांच्या कामाची गती पाहूनच आपण एकनाथ शिंदे यांच्या ओरिजनल शिवसेनेत प्रवेश केला. केवळ दोषारोप करणे आणि लोक पक्ष सोडून का जात आहेत, याचे आत्मपरीक्षण न करणे, अशी अनेक कारणे आहेत, असे सांगत यापुढेही अनेकजण इकडे येतील, कारण त्यांचा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वावर विश्वास आहे. भविष्यातही ठाकरे गटातून शिंदे गटात महिलांचे प्रवेश होतील, असे मनीषा कायंदे यांनी सांगितले. 

ठाकरे गटाची अडचण वाढण्याची शक्यता-

गेल्या वर्षभरात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात होत असलेला बदल आणि त्यांच्या कामाची गती पाहूनच आपण एकनाथ शिंदे यांच्या ओरिजनल शिवसेनेत प्रवेश केला. केवळ दोषारोप करणे आणि लोक पक्ष सोडून का जात आहेत, याचे आत्मपरीक्षण न करणे, अशी अनेक कारणे आहेत, असे सांगत यापुढेही अनेकजण इकडे येतील, कारण त्यांचा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वावर विश्वास आहे. भविष्यातही ठाकरे गटातून शिंदे गटात महिलांचे प्रवेश होतील, असे मनीषा कायंदे यांनी सांगितले. 

टॅग्स :उद्धव ठाकरेएकनाथ शिंदेशिवसेना