... याचा अर्थ शिल्लकसेनेला कळत असावा; शिंदे गटातील नेत्याचा शिवसेनेवर हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2022 04:56 PM2022-11-06T16:56:58+5:302022-11-06T16:58:31+5:30
शिवसेनेचे दिवंगत आमदार रमेश लटके यांची पत्नी ऋतुजा लटके यांनी अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत मोठ्या मताधिक्क्याने विजय मिळवला.
मुंबई- शिवसेनेचे दिवंगत आमदार रमेश लटके यांची पत्नी ऋतुजा लटके यांनी अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत मोठ्या मताधिक्क्याने विजय मिळवला. ऋतुजा यांनी केवळ बहुमतच नव्हे तर रमेश लटके यांचा विक्रम मोडला आहे.या निवडणुकीत नोटालाही जास्त मिळाली. नोटाला ९,५४७ मत मिळाली आहेत, यावरुन आताल आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनीही यावरुन उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.
शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी ट्विट करुन उद्धव ठाकरे गटावर टीका केली आहे. "आतापर्यंतच्या भारतातील इतिहासात प्रथमच पोटनिवडणुकीत NOTA ला एवढी जास्त मतदारांची पसंती मिळाली आहेत..याचा अर्थ शिल्लकसेनेला नक्कीच कळत असावा...' असं ट्विटमध्ये शीतल म्हात्रे यांनी म्हटले आहे.
आतापर्यंतच्या भारतातील इतिहासात प्रथमच पोटनिवडणुकीत NOTA ला एवढी जास्त मतदारांची पसंती मिळाली आहेत..याचा अर्थ शिल्लकसेनेला नक्कीच कळत असावा... https://t.co/fXLP8nitx1
— sheetal mhatre (@sheetalmhatre1) November 6, 2022
ऋतुजा लटकेंच्या विजयानंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
"लढाईची सुरुवातच विजयाने झाली आहे, त्यामुळे आता भविष्यातील विजयाची चिंता नाही. चिन्ह कुठलही असो पण जनता आमच्यासोबत आहेत. ज्यांनी आमचे नाव गोठवले, ते या निवडणुकीच्या आजुबाजूला फिरकलेले नाहीत, असा टोलाही शिंदे गटाला उद्धव ठाकरे यांनी लगावला.
निवडणुकीअगोदरच भाजपला पराभवाचा अंदाज आला होता, त्यामुळे त्यांनी निवडणूक लढली नाही. जमिनिवरचे प्रकल्प गुजरातले गेले आहेत. हवेतील प्रकल्प महाराष्ट्रात असंही उद्धव ठाकरे म्हणाले. नोटाला एवढं मतदान कोणी केले हे सगळ्यांना माहित आहे. त्यांनी निवडणूक लढवली असती तर ही नोटाची मत त्यांना मिळाली असती, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला.
विजयी! ऋतुजा लटकेंनी पतीचाही विक्रम मोडला; अपक्षांचे डिपॉझिटही जप्त केले
निवडणुकासमोर ठेवून राज्यातील प्रकल्प गुराजतला घेऊन गेले. गुजराच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रावर प्रेम वाढले आहे, प्रकल्पाबाबत चर्चा सुरू केली आहे, प्रकल्पाच्या भ्रमाचा फुगा फुटायच्याअगोदर राज्यात मध्यावधी निवडणुका होऊ शकतात, हा माझा अंदाज आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.