मंत्रिपद गेल खड्ड्यात, शिवरायांचा अवमान...; शिंदे गटातील 'या' मंत्र्यांचा सूचक इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2022 03:07 PM2022-12-04T15:07:07+5:302022-12-04T15:18:34+5:30

गेल्या काही दिवसापूर्वी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात एक वादग्रस्त वक्तव्य केले होते.

Shinde group minister Gulabrao Patil issued a warning after MLA Prasad Lad's statement about Chhatrapati Shivaji Maharaj | मंत्रिपद गेल खड्ड्यात, शिवरायांचा अवमान...; शिंदे गटातील 'या' मंत्र्यांचा सूचक इशारा

मंत्रिपद गेल खड्ड्यात, शिवरायांचा अवमान...; शिंदे गटातील 'या' मंत्र्यांचा सूचक इशारा

Next

मुंबई- गेल्या काही दिवसापूर्वी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात एक वादग्रस्त वक्तव्य केले होते. या वक्तव्यावरुन राज्यभरात आरोप-प्रत्यारोप सुरू होते. भाजप खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनीही या विधानाचा निषेध करत कारवाईची मागणी केली होती. आता आज भाजप आमदार प्रसाद लाड यांनीही कोकण महोत्सवामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात अजब वक्तव्य केल्याचे समोर आले आहे. यावरुन आरोप- प्रत्यारोप सुरू आहेत. यावर शिंदे गटातील मंत्री गुलाबराव पाटील यांनी सूचक इशारा दिला आहे. 

'कोणालाही छत्रपती यांच्या विषयी बोलण्याचा अधिकार नाही, कोणही उठते आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी बोलत आहे. आता इथून पुढे कुणी शिवरायांचा अवमान केला तर मी सोडणार नाही. मंत्रिपद गेले खड्ड्यात, असा इशारा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला. 

'शिवरायांविषयी कोणीही काहीही बोललेल खपवून घेणार नाही, तो कोणत्याही पक्षाचा असेल त्याला माफ केले जाणार नाही. शिवरायांवर बोलण्यासाठी आचारसंहिता करण्याची गरज आहे, असंही गुलाबराव पाटील म्हणाले.  

'छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला'; प्रसाद लाड यांचे वक्तव्य, राष्ट्रवादीकडून व्हिडिओ ट्विट

आमदार प्रसाद लाड काय म्हणाले? 

काल मुंबईतील कोकण महोत्सावात बोलताना आमदार प्रसाद लाड यांनी हे विधान केले. 'स्वराज्यभूमी कोकण महोत्सव कशासाठी हे तुम्ही विचाराल, हिंदवी स्वराज्याची स्थापन छत्रपती शिवाजी महाराज यांनी केली. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म हा कोकणात झाला. यानंतर रायगडावर त्यांचे बालपण गेले, त्यांची सुरूवात कोकणात झाली, असं आमदार प्रसाद लाड बोलत असल्याचे दिसत आहे. या वक्तव्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे.   

राष्ट्रवादी काँग्रेसकडून ट्विट करुन टीका केली आहे. 'भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी कोकण महोत्सवाच्या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला आहे असे विधान केले. दुसऱ्यांना इतिहास शिकवण्यापेक्षा स्वतःच्या आमदारांना इतिहासाचे धडे द्या.' असं ट्विटमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने म्हटले आहे. 

Web Title: Shinde group minister Gulabrao Patil issued a warning after MLA Prasad Lad's statement about Chhatrapati Shivaji Maharaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.