Join us

शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकरांना पोलीस ताब्यात घेणार; प्रभादेवीतील वाद भोवणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2022 8:17 AM

आमदार सदा सरवणकर यांची पिस्तूल चौकशीसाठी पोलीस घेणार ताब्यात 

मुंबई : शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या प्रभादेवीत शिवसेना आणि शिंदे गटात झालेल्या राड्यामुळे राजकारण तापले आहे. यामध्ये पोलीस ठाण्याच्या आवारात झालेल्या गोळीबारप्रकरणी आमदार सदा सरवणकर यांची पिस्तूल दादर पोलीस चौकशीसाठी ताब्यात घेणार आहेत. त्यानुसार, पोलिसांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. 

गणपती विसर्जनादरम्यान एकमेकांना डिवचल्याच्या रागातून शनिवारी रात्री प्रभादेवीत शिवसेना आणि शिंदे गटात हाणामारी झाली. दादर पोलिसांनी दोन्ही गटांविरोधात गुन्हा नोंदवत अधिक तपास करीत आहे. यामध्ये पोलीस ठाण्याबाहेर जमलेल्या गर्दी दरम्यान, सरवणकर यांनी एक गोळी जमिनीच्या दिशेने झाडल्यामुळे खळबळ उडाली. याच मुद्द्यावरून त्यांच्यावर कारवाईची मागणी वाढली. याप्रकरणी पोलिसांनी सरवणकर यांच्यासह इतर लोकांविरोधात आर्म्स ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला. याच प्रकरणाच्या तपासासाठी पोलीस सरवणकर यांची पिस्तूल पोलीस ताब्यात घेणार आहे. सरवणकर यांच्याकडे परवानाधारक पिस्तूल आहे.  त्याचे रेकॉर्ड पोलीस ठाण्यात असते. हे रेकॉर्डही पोलीस तपासात आहे. 

टॅग्स :सदा सरवणकरशिवसेनापोलिस