शिंदे सरकारचे सरासरी वय साठीच्या घरात; छगन भुजबळ ज्येष्ठ, अदिती तटकरे तरुण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2023 08:04 AM2023-07-06T08:04:30+5:302023-07-06T08:05:13+5:30

७५ वर्षांचे छगन भुजबळ सर्वात वयोवृद्ध आहेत, तर अदिती तटकरे तरुण ३५ वर्षांच्या आहेत. 

Shinde Sarkar's average age in households for on average 60 year; Chhagan Bhujbal senior, Aditi Tatkare junior | शिंदे सरकारचे सरासरी वय साठीच्या घरात; छगन भुजबळ ज्येष्ठ, अदिती तटकरे तरुण

शिंदे सरकारचे सरासरी वय साठीच्या घरात; छगन भुजबळ ज्येष्ठ, अदिती तटकरे तरुण

googlenewsNext

मुंबई : राज्यातील शिंदे सरकारमधील मंत्र्यांच्या वयाची सरासरी साठीच्या घरात आहे. ७५ वर्षांचे छगन भुजबळ सर्वात वयोवृद्ध आहेत, तर अदिती तटकरे तरुण ३५ वर्षांच्या आहेत. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ५९ वर्षांचे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ५२, तर उपमुख्यमंत्री अजित पवार ६३ वर्षांचे आहेत. हसन मुश्रीफ (६९), डॉ. विजयकुमार गावित (६७), दीपक केसरकर (६७), मंगलप्रभात लोढा (६७),  दिलीप वळसे-पाटील (६६), सुरेश खाडे (६५), राधाकृष्ण विखे पाटील (६४), चंद्रकांत पाटील (६४), गिरीश महाजन (६३) अतुल सावे (६१), सुधीर मुनगंटीवार (६०) हे मंत्री साठीपार आहेत. धनंजय मुंडे (४७), संजय बन्सोड (४९), उदय सामंत (४७), अदिती तटकरे (३५) असे मंत्री आहेत. पन्नाशी पार केलेले संदीपान भुमरे (५९),  गुलाबराव पाटील (५७), शंभूराज देसाई (५६), धर्मरावबाबा आत्राम (५६), रवींद्र चव्हाण (५२),  संजय राठोड (५२) यांनी मंत्रिमंडळाची सरासरी साठीच्या आत ठेवली आहे.

Web Title: Shinde Sarkar's average age in households for on average 60 year; Chhagan Bhujbal senior, Aditi Tatkare junior

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.