Join us

विधानपरिषद पदवीधर आणि शिक्षक निवडणूक शिंदे सेना स्वतंत्र लढणार! २६ जूनला मतदान

By मनोहर कुंभेजकर | Published: June 05, 2024 11:54 AM

लोकसभेच्या निवडणुकीचे निकाल आल्यानंतर बऱ्याच शक्यता वर्तवण्यात येत आहेत

मनोहर कुंभेजकर, मुंबई: २६ जून रोजी होणाऱ्या विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक आणि कोकण पदवीधर निवडणुका शिंदे सेना स्वतंत्र लढणार आहे. शिंदेसेनेचे मुख्य नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने मुंबई पदवीधर मधून माजी आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत, मुंबई शिक्षकमधून शिवाजी शेंडगे आणि कोकण पदवीधर मधून शिंदे सेनेचे सचिव संजय मोरे आज सकाळी कोकण भवन येथे आपला निवडणूक अर्ज सादर करणार असल्याची माहिती सूत्रांनी 'लोकमत'ला दिली.

यापूर्वी भाजपने मुंबई पदवीधर साठी किरण शेलार, मुंबई शिक्षक साठी शिवनाथ दराडे आणि कोकण पदवीधर साठी विद्यमान आमदार निरंजन डावखरे यांची उमेदवारी जाहिर केली आहे. तर उद्धव सेनेने पदवीधरसाठी माजी मंत्री डॉ. अनिल परब, तर शिक्षक मधून ज. मो. अभ्यंकर यांची जाहीर केली आहे.

टॅग्स :विधान परिषद निवडणूकविधान परिषदएकनाथ शिंदे