समीर वानखेडेंना शिंदेसेनेचा नकार, संजय शिरसाट यांनी स्पष्टच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2024 10:24 AM2024-10-18T10:24:25+5:302024-10-18T10:25:00+5:30
शिंदेसेनेकडून उमेदवारी मिळावी यासाठी वानखेडे यांनी ‘वर्षा’वर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. मात्र, त्यांना उमेदवारी मिळणार नसल्याचे शिंदेसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी सांगितले.
मुंबई : अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्ज प्रकरणात अटक केल्यानंतर चर्चेत आलेले आयआरएस अधिकारी समीर वानखेडे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची चर्चा आहे. त्यांनी विविध पक्षांकडे उमेदवारीसाठी चाचपणीही केली. शिंदेसेनेकडून उमेदवारी मिळावी यासाठी वानखेडे यांनी ‘वर्षा’वर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. मात्र, त्यांना उमेदवारी मिळणार नसल्याचे शिंदेसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी सांगितले.
भारतीय महसूल सेवेच्या २००८ च्या बॅचचे अधिकारी समीर वानखेडे हे सध्या चेन्नईमध्ये कार्यरत आहेत. आर्यन खान प्रकरणानंतर त्यांच्याविरोधात अनेक आरोप झाले होते. यासंदर्भात वानखेडे यांना संपर्क केला पण त्यांनी प्रतिसाद दिला नाही.