Join us

जाहिरातींमध्ये चमकतोय डेंग्यूचा डास

By admin | Published: November 11, 2014 1:54 AM

‘बुंदों से जैसे सागर बने, बुंदों में वैसेही मच्छर पले’ यासह घर आणि परिसरात पाणी साचू देऊ नका, असा संदेश देत महापालिका डेंग्यू रोखण्यासाठी जाहिरातींचा कल्पक वापर करीत आहे.

पूजा दामले ल्ल मुंबई
‘बुंदों से जैसे सागर बने, बुंदों में वैसेही मच्छर पले’ यासह घर आणि परिसरात पाणी साचू देऊ नका, असा संदेश देत महापालिका डेंग्यू रोखण्यासाठी जाहिरातींचा कल्पक वापर करीत आहे. तर, दुसरीकडे काही कंपन्यादेखील आता त्यांचा उत्पादनांचा खप वाढण्यासाठी ‘डेंग्यूच्या डासांपासून संरक्षण मिळवा’ अशा थेट जाहिराती करताना दिसून येत आहेत. 
डेंग्यूच्या डासांची पैदास ही साचलेल्या स्वच्छ पाण्यात होत असल्यामुळे ती प्रामुख्याने घरांमध्ये होत असल्याचे समोर आले आहे. तसेच डेंग्यूचे डास हे दिवसा चावतात, अशी माहितीही गेल्या काही दिवसांपासून सर्व प्रसारमाध्यमांमार्फत सर्वदूर पोहोचली आहे. डेंग्यूविषयीच्या बातम्या रोज टीव्हीवर, वर्तमानपत्रतून प्रसिद्ध होत आहेत. डेंग्यू मुंबईत चांगलाच बळावला असून, यामुळे मृत्यूदेखील झाले आहेत. या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन जाहिरातींमध्ये तत्काळ बदल करण्यात आले आहेत. आधी फक्त डासांना मारणारे स्प्रे, डासांपासून बचाव करणारी क्रीम्स अशा जाहिराती होत होत्या. पण आता हीच उत्पादने डेंग्यू टाळण्यासाठी ‘संरक्षक उत्पादने’ बनली आहेत. 
बाजारामध्ये अनेक प्रकारच्या जाहिराती असतात. त्यामध्ये आपल्याच उत्पादनाकडे सर्वाचे लक्ष वेधले पाहिजे यासाठी स्पर्धा असते. मुंबईतील डेंग्यूचे प्रमाण वाढले आहे. या वेळी ग्राहकांच्या मानसिकतेचा अभ्यास करून अशा प्रकारे जाहिरातींमध्ये बदल केलेला आहे. वाढणा:या डेंग्यूमुळे घाबरलेल्यांना लक्ष्य करून आमचेच उत्पादन तुमची मदत करेल, असे त्यांच्या मनावर ठसवण्याचा प्रयत्न होत आहे. अशा प्रकारच्या प्रसिद्धीमुळे काही प्रमाणात नकारात्मकता दिसून येत आहे. यातून एक प्रकारे, घाबरवले जाते आणि यातून सुटका हवी असल्यास विशिष्ट उत्पादन मदत करू शकते, असा संदेश दिला जात आहे. हे जाहिरातीचे तंत्र असल्याचे जाहिराततज्ज्ञ माधव शिरवळकर यांनी सांगितले. 
 
आधी फक्त डासांना मारणारे स्प्रे, डासांपासून बचाव करणारी क्रीम्स अशा जाहिराती होत होत्या. पण आता हीच उत्पादने डेंग्यू टाळण्यासाठी ‘संरक्षक उत्पादने’ बनली आहेत. जाहिरातींचा मुख्य हेतू हा लोकांचे लक्ष वेधून घेणो हा असतो. ते अशा पद्धतीने आपला हेतू साध्य करत आहेत.