Join us

आंतरराष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत भारतीय मुलांची चमकदार कामगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2019 12:34 AM

मुंबई : नुकत्याच थायलंड येथे पार पडलेल्या १९ व्या पामा ग्लोबल अबॅकस आणि मेंटल अरिथमॅटिक कॉम्पिटिशन या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये ...

मुंबई : नुकत्याच थायलंड येथे पार पडलेल्या १९ व्या पामा ग्लोबल अबॅकस आणि मेंटल अरिथमॅटिक कॉम्पिटिशन या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये भारतीय मुलांनी चमकदार कामगिरी करून भारताला विविध गटांमध्ये सुमारे ७८ बक्षिसे मिळवून दिली आहेत.थायलंडमधील पामा ग्लोबल असोसिएशनची १९ वी आंतरराष्ट्रीय अबॅकस स्पर्धेचे २२ डिसेंबर रोजी आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी जगभरातील एकूण २७ देशांमधील सहाशे मुलांची निवड करण्यात आली होती.या स्पर्धेमध्ये एका मिनिटामध्ये सुमारे शंभर गणिताचे प्रश्न सोडवायचे असतात. या स्पर्धेचे मूल्यमापन वयोगट आणि स्तरानुसार वेगवेगळ्या गटामध्ये केले जाते. पामा इंडिया आणि अक्षरशिल्प पिमास प्रा.लि. यांच्या संयुक्त विद्यमाने भारतातील मुलांची निवड या स्पर्धेसाठी करण्यात येते.या स्पर्धेत वरळी येथील कुमार प्रज्वल उत्तम जेडगुळे, नवी मुंबई, सीवुड येथील ऋग्वेद दीपक तांडेल आणि पुणे येथील अवनी रमेश गोपले यांनी विविध गटांमध्ये प्रथम क्रमांक मिळवत भारताला बहुमान मिळवून दिला. त्याचबरोबर २७ मुलांना द्वितीय आणि ४७ मुलांना तिसरा क्रमांक मिळाला, अशी माहिती पामा इंडिया संस्थेचे अध्यक्ष अबाजी काळे यांनी दिली. मुंबई विमानतळावर पालक आणि इतरांनी मोठ्या जल्लोषात या मुलांचे स्वागत केले.