जलवाहतुकीने ट्रॅफिकचा प्रश्न सुटेल

By admin | Published: January 5, 2015 01:40 AM2015-01-05T01:40:11+5:302015-01-05T01:40:11+5:30

मुंबईसह उपनगरांचा वाहतुकीचा, त्यातून होणाऱ्या प्रदूषणाचा प्रश्न समुद्रमार्गे जलवाहतुकीस प्राधान्य दिल्यास निश्चित सुटेल.

Shipping will solve traffic issues | जलवाहतुकीने ट्रॅफिकचा प्रश्न सुटेल

जलवाहतुकीने ट्रॅफिकचा प्रश्न सुटेल

Next

मुंबई : मुंबईसह उपनगरांचा वाहतुकीचा, त्यातून होणाऱ्या प्रदूषणाचा प्रश्न समुद्रमार्गे जलवाहतुकीस प्राधान्य दिल्यास निश्चित सुटेल. त्यातून स्वच्छ, प्रदूषणमुक्त मुंबईचे स्वप्न साकार होईल. यासाठी केंद्रीय वाहतूक खाते पुढाकार घेत आहे. मुंबईकरांनी सरकारवर या दृष्टीने दबाव आणावा, राज्य सरकारनेही जलवाहतुकीस प्राधान्य द्यावे, अशी अपेक्षा केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली.
शब्दगप्पांमध्ये केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची मुलाखत सुधीर गाडगीळ यांनी घेतली. राज्य सरकारनेही नवे पॉटर पोर्ट बांधावे, बस-बोटी खरेदी कराव्यात, असे गडकरींनी सुचविले. केंद्र शासन गंगा नदीसह मोठ्या नद्यांवर जलवाहतूक सुरू करीत आहे. वाराणसी ते हल्दीचा असा जलवाहतूक मार्ग विकसित करीत आहे, अशी माहिती गडकरींनी दिली. त्याचप्रमाणे मुंबईत खाडी, समुद्रमार्गे वॉटर स्टेशन बनवून दक्षिण मुंबईसह, उपनगर, ठाणे, नवी मुंबई अशा शहरांना जलवाहतुकीने जोडता येईल. स्वीडन बनावटीच्या पाणी आणि रस्ते अशा दोन्ही ठिकाणी चालणाऱ्या बस आहेत. त्यांचा वापर करता येईल़ तशी आम्ही चाचणी मुंबईत घेतली आहे, असे गडकरींनी सांगितले.
बेस्ट बस डिझेलऐवजी इलेक्ट्रॉनिक केल्यास खर्च वाचेल, त्यामुळे प्रदूषणाची पातळीही कमी होईल, असे गडकरी म्हणाले. (प्रतिनिधी)

Web Title: Shipping will solve traffic issues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.