ऑनलाइन लोकमत
मुंबई, 8 एप्रिल २०१७ - भारतातील अम्युजमेंट पार्क्स, वॉटर पार्क्स आणि कौटुबिंक मनोरंजन केंद्रांचे हित जपणारी मुख्य संघटना इंडियन असोसिएशन ऑफ अम्युजमेंट पार्क्स अँड इंडस्ट्रीजने (आयएएपीआय) एस्सेल वर्ल्ड आणि वॉटर किंग्डमचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष देशपांडे यांची संघटनेचे दहावे अध्यक्ष म्हणून निवड केली आहे. मनोरंजन आणि अम्युमेंट उद्योगक्षेत्रातील प्रसिद्ध नाव असलेले देशपांडे आयएएपीआयचे दहावे अध्यक्ष श्री. अजय सरिन यांच्याकडून दहाव्या अध्यक्षपदाची सूत्रे घेतील.
आयएएपीआयचे अध्यक्ष या नात्याने देशपांडे भारतात मनोरंजनासाठी हितावह आणि शाश्वत वातावरण तयार करण्याचा आयएएपीआयचा अजेंडा संघटनेच्या घटकधारकांच्या मदतीने राबवतील. त्यांच्या नेतृत्वाखाली हा अजेंडा व्यवसायाच्याही पलीकडे जाऊन पर्यटनास चालना देण्यासाठी, रोजगार तयार करण्यासाठी, या क्षेत्रातील सुरक्षा पद्धती प्रचलित करण्यासाठी आणि गुंतवणुकदारांना आकर्षित करण्यासाठी या उदयोन्मुख क्षेत्राचे शाश्वत व्यासपीठात रुपांतर करणे इत्यादी कामांत महत्त्वाची भूमिका निभावणार आहेत.
शिरीष देशपांडे, एस्सेल वर्ल्ड आणि वॉटर किंग्डमचे सध्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना हे दोन्ही ब्रँड्स नव्या उंचीवर नेण्याचे श्रेय दिले जाते. पुण्याच्या सीझन्स मॉलमधील डाउनटाउन एस्सेलवर्ल्डद्वारे हॉस्पिटॅलिटी आणि कौटुंबिक मनोरंजन क्षेत्रात ब्रँडला स्थान मिळवून देण्याची कामगिरीही त्यांनी पार पाडली.
आयएएपीआयसारख्या स्वतःच एक संस्था असलेल्या संघटनेचे नेतृत्व करण्याची संधी मिळणे हा मी माझा सन्मान समजतो. मनोरंजन आणि अम्युजमेंट पार्क उद्योग हा अतिशय अभिनव आणि आव्हानात्मक असून त्यात विकासाची भरपूर क्षमता आहे. बदलाच्या उंबरठ्यावर असलेले हे क्षेत्र तंत्रज्ञानात लक्षणीय गुंतवणूक केल्यास आणखी विस्तारेल व त्यामुळे ग्राहक अनुभव उंचावण्यास मदत होई. मी या नव्या भूमिकेत या क्षेत्रात काम करण्यासाठी उत्सुक आहे. असे मत शिरीष देशपांडे यांनी व्यक्त केले.