जीवनविद्या मिशनच्या शितल गोरे यांचा साहेब प्रतिष्ठान, गोराई संस्थेच्या वतीने मानपत्र आणि सन्माचिन्ह देऊन सत्कार

By मनोहर कुंभेजकर | Published: March 9, 2023 05:17 PM2023-03-09T17:17:29+5:302023-03-09T17:17:40+5:30

मुंबई - जागतिक महिला दिनानिमित्त  जीवनविद्या मिशनचे प्रणेते सद्गुरू श्री वामनराव पै यांच्या सतशिष्या व प्रबोधक शितल  गोरे (दिदी)यांना ...

Shital Gore of Jeevanvidya Mission felicitated with certificate and badge on behalf of Saheb Pratishthan, Gorai Institute | जीवनविद्या मिशनच्या शितल गोरे यांचा साहेब प्रतिष्ठान, गोराई संस्थेच्या वतीने मानपत्र आणि सन्माचिन्ह देऊन सत्कार

जीवनविद्या मिशनच्या शितल गोरे यांचा साहेब प्रतिष्ठान, गोराई संस्थेच्या वतीने मानपत्र आणि सन्माचिन्ह देऊन सत्कार

googlenewsNext

मुंबई - जागतिक महिला दिनानिमित्त  जीवनविद्या मिशनचे प्रणेते सद्गुरू श्री वामनराव पै यांच्या सतशिष्या व प्रबोधक शितल  गोरे (दिदी)यांना जागतिक महिला दिनी, साहेब प्रतिष्ठान, गोराई या संस्थेच्या वतीने मानपत्र व सन्माचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. गेली तीस वर्षे शितल  गोरे (दिदी) या स्वतःचे कुटुंब, व्यवसाय सांभाळून सद्गुरूनकडून मिळालेल्या ज्ञानाच्या माध्यमातून आणि आता श्री. प्रल्हाद वामनराव पै, सद्गुरुंचे सुपुत्र व जीवनविद्या मिशनचे आजीव विश्वस्त, युथ मेंटॉर, कॉर्पोरेट कोच यांच्या मार्गदर्शना नुसार समाजात जाऊन ज्ञानदानाचे कार्य मोठ्या प्रमाणात करीत आहेत. 

याच बरोबर त्या जीवनविद्या फाऊंडेशनच्या विश्वस्त म्हणूनही कार्यरत आहेत.तसेच महाराष्ट्र, गोवा, बेळगाव इत्यादी ठिकाणी विध्यार्थी, शिक्षक, पालक तसेच समाजातील विविध स्तरातील महिला व पुरुष वर्गाला सतत मार्गदर्शन करीत असतात.

यावेळी माजी शिक्षण समिती अध्यक्ष  संध्या दोशी यांनी  अशा प्रकारे स्वतःचे कुटुंब, व्यवसाय सांभाळून समाजासाठी काहीतरी नवीन करून दाखविणे हे खूप कौतुकास्पद आहे असे गौरवोद्गार काढले. तर बोरिवली पोलिस ठाण्याच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक अश्विनी घोलवे या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. त्यांनीही आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की स्वतःचे कुटुंब आणि व्यवसाय करणे हे जसे आपण आपले कर्तव्य समजतो तसेच समाजासाठीही आपण योगदान दिले पाहिजे. आणि त्याप्रमाणे शितल  गोरे  या गेली तीस वर्षे हे कार्य करीत आहेत.
  
सत्काराला उत्तर देताना  शितल गोरे यांनी सद्गुरू श्री वामनराव पै लिखित विश्व प्रार्थनेने सुरुवात केली.  उपस्थित महिला वर्गाला आपल्या ओघावत्या शैलीत नियमित जीवन जगत असताना वापरायच्या युक्त्या सांगितल्या. त्याच बरोबर एक महत्वाचा कानमंत्र दिला. प्रत्येक स्त्रीने समजतील प्रत्येक स्त्रीचा सन्मान, आदर केला पाहिजे. याची सुरुवात आपल्या घरातून केली पाहिजे. मग ती आई असेल, बहिण असेल, सासू असेल कोणत्याही नात्याने ती आपल्या अवतभोवती असेल तिचा आपण मान ठेवला पाहिजे असे आवाहन त्यांनी केले.

शेवटी सद्गुरू श्री वामनराव पै प्रणित जीवनविद्या मिशन संस्थेचे व साहेब प्रतिष्ठान संस्थेचे आणि सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांची कृतज्ञता व्यक्त केली व साहेब प्रतिष्ठान संस्थेच्या कार्यास शुभेच्छा दिल्या. या वेळी आयुर्वेदाचार्य गौरी सरवणकर व कु. ऱ्हित्वी पाटील यांचाही संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
 

Web Title: Shital Gore of Jeevanvidya Mission felicitated with certificate and badge on behalf of Saheb Pratishthan, Gorai Institute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई