मुंबई-पश्चिम दुर्तगती महामार्गावरील आज सकाळी विलेपार्ले (पूर्व)येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसर आज शिवरायांच्या घोषणांनी दुमदुमला.यावेळी उद्धव सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवसेनाप्रमुख,आमदार आदित्य ठाकरे यांनी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन केले.भारतीय कामगार सेनेच्या वतीने येथे शिवजयंती उत्सव आयोजित केला होता. यावेळी येथे आकर्षक फुलांची सजावट केली होती.
याप्रसंगी खासदार व भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष अरविंद सावंत,आमदार व विभागप्रमुख अँड.अनिल परब,उपनेते,आमदार सचिन अहिर,आमदार वरुण सरदेसाई,आमदार हारून खान,आमदार महेश सावंत,अजित साळवी,संयुक्त सरचिटणीस संजय कदम यांच्यासह भारतीय कामगार सेनेच्या प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांना यावेळी अभिवादन केले.