शिवसैनिकाचे ‘मातोश्री’ बाहेर निधन; उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी गेले होते, अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2022 09:01 AM2022-07-07T09:01:23+5:302022-07-07T09:01:59+5:30

पक्षावरील ताब्यावरून नजीकच्या काळात ठाकरे विरुद्ध मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात मोठा संघर्ष होण्याची शक्यता आहे

Shiv Sainik dies outside 'Matoshri'; had gone to meet Uddhav Thackeray | शिवसैनिकाचे ‘मातोश्री’ बाहेर निधन; उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी गेले होते, अन्...

शिवसैनिकाचे ‘मातोश्री’ बाहेर निधन; उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी गेले होते, अन्...

googlenewsNext

ठाणे : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी आलेल्या शहापूर तालुक्यातील पदाधिकाऱ्यांमधील भगवान काळे यांचे ‘मातोश्री’ निवसस्थानाबाहेर निधन झाले. वाशाळा गावातील पदाधिकाऱ्यांना ते आपल्या गाडीतून मातोश्रीवर दाखल झाले होते. बैठक सुरू असतानाच त्यांना अस्वस्थ वाटू लागले. काळे यांना कलानगर येथील रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन त्यात त्यांचा मृत्यू झाला.

शिवसेनेचे खासदारही शिंदेंच्या संपर्कात

शिंदे यांच्यासोबत जाण्याची स्पष्ट भूमिका शिवसेनेच्या एकाही खासदाराने आतापर्यंत घेतलेली नाही. मात्र, १२ खासदार हे शिंदे यांच्या संपर्कात असल्याचे म्हटले जाते. माजी मंत्री गुलाबराव पाटील यांनी तसा दावा केला आहे. शिवसेनेच्या चार खासदारांनी बंडाच्या काळात भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांची गुप्त भेट घेतल्याचे वृत्त एका वाहिनीने दिले होते. भाजपच्या राष्ट्रपतिपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचा दबाव पक्षातील अधिकाधिक खासदारांकडून येऊ शकतो. 

खासदार फुटले तर राज्यातील सत्ता हातून गेलेल्या ठाकरे यांना दुसरा मोठा धक्का बसेल. पक्षावरील ताब्यावरून नजीकच्या काळात ठाकरे विरुद्ध मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात मोठा संघर्ष होण्याची शक्यता आहे. त्या संघर्षात खासदारही साथ सोडून गेले तर 
ठाकरे यांच्या अडचणींमध्ये मोठी वाढ होणार आहे. 

ठाकरे काय निर्णय घेणार?
भाजपच्या मांडीला मांडी लावून बसणार नाही, अशी स्पष्ट भूमिका उद्धव ठाकरे यांनी आधीच घेतली आहे. अशावेळी त्यांनी काँग्रेस व विरोधी पक्षांचे उमेदवार यशवंत सिन्हा यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला तर शिवसेना खासदारांमध्ये फूट पडण्याची शक्यता आहे. 
सिन्हा यांना पाठिंबा दिला तर खासदार फुटतात आणि द्रौपदी मुर्मू यांच्या पाठीशी उभे राहिले तर सत्ता हिसकावून घेणाऱ्या भाजपबरोबर जावे लागेल, अशी उद्धव ठाकरे यांची कोंडी होऊ शकते. मात्र, दोनपैकी एक निर्णय त्यांना घ्यावाच लागेल. 

Web Title: Shiv Sainik dies outside 'Matoshri'; had gone to meet Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.