Video : मंगेश कुडाळकर यांच्या कार्यालयाची शिवसैनिकांनी केली तोडफोड, दिलीप लांडेंविरीधात घोषणाबाजी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2022 05:53 PM2022-06-24T17:53:59+5:302022-06-24T17:59:02+5:30
Mangesh Kudalkar : कार्यालयाची तोडफोड केली. घटनास्थळी पोलीस कर्मचारी उपस्थित होते. मात्र, शिवसैनिकांनी कार्यालयावरील फलकी तोडून नुकसान केले.
मुंबई : शिवसेनेमध्ये दोन गट पडल्यानंतर उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट असा संघर्ष टोकाला पोहचला आहे. आपला गट हीच खरी शिवसेना असा दावा एकनाथ शिंदे विधानसभा उपाध्यक्षांना पत्र पाठवून करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एकनाथ शिंदे यांनी आपल्याकडे 42 आमदारांचं समर्थन असल्याचा दावा केला आहे. कुर्ला येथील शिवसेनेचे आमदार मंगेश कुडाळकर एकनाथ शिंदे गटात काल सामील झाले. त्यानंतर आज शिवसैनिकांनी आपला रोष व्यक्त करत मंगेश कुडाळकर यांच्या कार्यालयावर दगडफेक केली. तसेच कार्यालयाची तोडफोड केली. घटनास्थळी पोलीस कर्मचारी उपस्थित होते. मात्र, शिवसैनिकांनी कार्यालयावरील फलकी तोडून नुकसान केले.
सामान्य शिवसैनिक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरला आहे. शिवसेना आमदार दिलीप लांडे हे शिंदे गटात गेल्यानं शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट उसळली. चांदिवलीमध्ये शिवसैनिकांनी आमदार दिलीप लांडे यांचे बॅनर्स फाडले. माजी नगरसेवक सोमनाथ सांगळे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी साकीनाका चौकात लागलेले दिलीप लांडे यांचे बॅनर्स फाडले. तसेच कुर्ला विधानसभा शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर हे एकनाथ शिंदे यांच्या गटात जाऊन मिळाल्याने त्यांच्याविरोधातही शिवसैनिकांमध्ये संताप आहे. चुनाभट्टीमध्ये शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरुन कुडाळकरांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच त्यांचे बॅनरही फाडण्यात आले.
कुर्ला येथील शिवसेनेचे आमदार मंगेश कुडाळकर एकनाथ शिंदे गटात काल सामील झाले. त्यानंतर आज शिवसैनिकांनी आपला रोष व्यक्त करत मंगेश कुडाळकर यांच्या कार्यालयावर दगडफेक केली. तसेच कार्यालयाची तोडफोड केली. pic.twitter.com/ZyiggKWfts
— Lokmat (@lokmat) June 24, 2022
शिवसेना आमदार दिलीप लांडे हे शिंदे गटात गेल्यानं शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट उसळली. चांदिवलीमध्ये शिवसैनिकांनी आमदार दिलीप लांडे यांचे बॅनर्स फाडले. माजी नगरसेवक सोमनाथ सांगळे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी साकीनाका चौकात लागलेले दिलीप लांडे यांचे बॅनर्स फाडले. pic.twitter.com/1W6sL7lXHz
— Lokmat (@lokmat) June 24, 2022