“जुन्या बंडाच्या आठवणी आपण पुसून टाकल्या आहेत, आता काही लोकं दिसतही नाहीत”

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2022 11:01 PM2022-06-25T23:01:31+5:302022-06-25T23:02:42+5:30

आदित्य ठाकरेंनी शिवसैनिकांच्या मेळाव्यात बोलताना, अप्रत्यक्षरित्या राज ठाकरेंना टोला लगावल्याची चर्चा असल्याचे सांगितले जात आहे.

shiv sena aditya thackeray indirectly taunts mns chief raj thackeray in mumbai melava | “जुन्या बंडाच्या आठवणी आपण पुसून टाकल्या आहेत, आता काही लोकं दिसतही नाहीत”

“जुन्या बंडाच्या आठवणी आपण पुसून टाकल्या आहेत, आता काही लोकं दिसतही नाहीत”

Next

मुंबई: ठाकरे सरकारमधील मंत्री आणि शिवसेनेच्या प्रमुख फळीतील नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राज्यातील वातावरण अधिकच तापताना दिसत आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यातील राजकारण ढवळून निघत आहे. शिवसेनेसाठी हा एक मोठा भूकंप मानला जात आहे. यानंतर आता शिवसेना आणि शिंदे गट यांतील संघर्ष आणखी तीव्र होताना दिसत आहे. एका बाजूला बंडखोरी मोडून काढण्यासाठी प्रयत्न सुरू असताना, मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता शिवसेनेने विविध ठिकाणी मेळावे घेण्यास सुरुवात केली आहे. यातच एका मेळाव्यात बोलताना आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर अप्रत्यक्षरित्या टोला लगावल्याचे सांगितले जात आहे. 

मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून, ते आपल्या शिवतीर्थ या निवासस्थानी परतले आहेत. दुसरीकडे, एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यात एकच रणधुमाळी सुरू झाली आहे. यापूर्वीही अनेकदा शिवसेनेतून अनेक बंड झाल्याचे पाहायला मिळाले. अगदी छगन भुजबळ यांच्यापासून ते नारायण राणे यांच्यापर्यंत अनेकांदी बंडाचे पाऊल उचचले. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेला मोठा हादरा बसला आहे. यातून आता पुढे जाण्यासाठी शिवसैनिकांची नव्याने मोट बांधून आगामी महानगरपालिका निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्धार करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. एका मेळाव्यात बोलताना आदित्य ठाकरे यांनी बंडाळीबाबत भाष्य केले. 

जुन्या बंडाच्या आठवणी आपण पुसून टाकल्या आहेत

गेले अनेक वर्ष आपण शिवसेना म्हणून एकत्र आहोत, कोणाचा डोळा असला तरी मुंबईला कोणाची नजर लागू दिली नाही. ज्यांनी सभागृहात ताकद दाखवली ते आज आमच्यासोबत आहेत. गेले दोन चार दिवस जे वातावरण आहे, त्यावरून एकच दिसतेय आता घाण निघून गेली, जे काही व्हायचे ते चांगलेच होणार, असे आदित्य ठाकरे म्हणाले. तसेच गेल्या काही काळातील बंडांच्या आठवणीही आपण पुसून टाकल्या आहेत. मात्र, त्यातील आता काही दिसतही नाही, असा टोला लगावला. हा टोला राज ठाकरे यांना लगावल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. 

ग्लासगोला जाताना त्यांनी सर्जरी होती तेव्हाही मला थांबवले नाही

कोविडच्या कठीण काळात महाराष्ट्राला दिशा देणारा, सर्वांची काळजी घेणारा, घरातला नाव घेणारा म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नाव प्रसिद्ध झाले आहे. ग्लासगोला जाताना त्यांनी सर्जरी होती तेव्हाही त्यांनी मला थांबवले नाही. त्या ठिकाणीही त्यांचे कौतुक करण्यात आले. राज्यासाठी आम्ही ८० हजार कोटींचे करार केले, पण आपल्याला विकण्यासाठी करार केले नाही. मुंबई महानगरपालिकेवर भाजपचा डोळा आहे. मात्र, ते होणे शक्य नाही. कारण अयोध्येला जाऊन आल्यावर चांगलेच होते, असे स्वानुभव आहेत, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. 

दरम्यान, विधान परिषदेसाठी सचिन अहिर यांना शब्द दिलाय तो पाळणार म्हणजे पाळणार. प्रत्येक शिवसैनिकाला जो शब्द दिलाय तो मी पाळणार असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. राज्यसभेसाठी राऊत यांना पाठवायचे आहे, पण संजय पवार हे सामान्य शिवसैनिक आहे. सामान्य कार्यकर्त्यांनाही आम्ही संधी दिली आहे, असे सांगत सचिन भाऊ तुम्ही फ्लोअर टेस्टबद्दल सांगितले. ज्या दिवशी ते मुंबईत उतरतील, एअरपोर्टकडून विधानभवनाकडे जाण्याचे रस्ते वरळीतून आहे, नाहीतर आपल्या परळमधून आहेत. तिसरा रस्ता आपल्या भायखळ्यातून आहे आणि येणार आपल्या वांद्र्यामधून असे सूचक वक्तव्यही आदित्य ठाकरे यांनी केले. 
 

Web Title: shiv sena aditya thackeray indirectly taunts mns chief raj thackeray in mumbai melava

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.