Dadra And Nagar Haveli Bypoll: “दादरा नगर हवेलीतील विजय हा अन्याय व हुकुमशाहीविरुद्ध जनतेने दिलेला कौल”: आदित्य ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2021 07:14 PM2021-11-02T19:14:13+5:302021-11-02T19:14:59+5:30

Dadra And Nagar Haveli Bypoll: दादरा नगर हवेलीचे अपक्ष खासदार मोहन डेलकर यांच्या आकस्मिक निधनामुळे ही पोटनिवडणूक झाली.

shiv sena aditya thackeray reaction on dadra and nagar haveli bypoll election result | Dadra And Nagar Haveli Bypoll: “दादरा नगर हवेलीतील विजय हा अन्याय व हुकुमशाहीविरुद्ध जनतेने दिलेला कौल”: आदित्य ठाकरे

Dadra And Nagar Haveli Bypoll: “दादरा नगर हवेलीतील विजय हा अन्याय व हुकुमशाहीविरुद्ध जनतेने दिलेला कौल”: आदित्य ठाकरे

Next

मुंबई: देशात विविध ठिकाणी झालेल्या विधानसभा तसेच लोकसभा पोटनिवडणुकांचे निकाल हाती आले. यामध्ये बहुतेक सर्वच ठिकाणी भाजपला पराभवाचा सामना करावा लागल्याचे चित्र आहे. केंद्रशासित दादरा नगर हवेली (Dadra And Nagar Haveli Bypoll) येथील लोकसभेच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेने (Shiv Sena) दणदणीत विजय मिळवला आहे. शिवसेनेच्या उमेदवार कलाबेन डेलकर (Kalaben Delkar) यांनी ४७ हजारांहून अधिक मतांनी भाजप उमेदवाराला पराभूत केले आहे. या विजयानंतर शिवसेनेचे नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी प्रतिक्रिया देत, दादरा नगर हवेलीतील विजय हा अन्याय व हुकुमशाहीविरुद्ध जनतेने दिलेला कौल आहे, असे म्हटले आहे. 

दादरा नगर हवेलीचे अपक्ष खासदार मोहन डेलकर यांच्या आकस्मिक निधनामुळे ही पोटनिवडणूक झाली. या पोटनिवडणुकीत शिवसेनेने मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर यांना उमेदवारी दिली. या पोटनिवडणुकीत कलाबेन डेलकर यांनी मिळवलेल्या विजयानंतर आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत यावर भाष्य केले आहे. या ट्विटमध्ये डेलकर कुटुंबीयांनी शिवसेनेत प्रवेश केला त्यावेळचा फोटो असून इतर दोन फोटो निवडणूक प्रचारातील आहेत. आदित्य ठाकरे यांनी कलाबेन डेलकर यांचं विजयाबद्दल अभिनंदन केले आहे. 

निश्चितच एका नव्या विकास पर्वाची नांदी

दादरा नगर हवेलीत आज भगवा फडकला. लोकसभा पोटनिवडणुकीत श्रीमती कलाबेन डेलकर यांचा विजय निश्चितच एका नव्या विकास पर्वाची नांदी आहे. अन्याय आणि हुकूमशाही विरुद्ध जनतेनं दिलेला हा कौल असून आता जनतेच्या हितासाठी दिल्लीत शिवसेनेचा आवाज आणखी बुलंद होईल, हा विश्वास आहे, असे ट्विट आदित्य ठाकरे यांनी केले आहे. आदित्य ठाकरे यांच्याबरोबरच शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी दादरा नगर हवेलीमध्ये डेलकर यांच्यासाठी प्रचार सभा घेतल्या होत्या. त्याचा अपेक्षित परिणाम दिसून आला आहे. कलाबेन मोठ्या मताधिक्यानं विजयी झाल्या आहेत. डेलकर यांनी भाजपचे उमेदवार महेश गावित यांना पराभवाची धूळ चारली.

दरम्यान, मोहन डेलकर यांनी फेब्रुवारी महिन्यात मुंबईतील एका हॉटेलात गळफास लावून आत्महत्या केली होती. या आत्महत्येमुळे प्रचंड खळबळ उडाली होती. मोहन डेलकर यांनी आत्महत्येपूर्वी एक सुसाइड नोट लिहून ठेवली होती. त्यात दादरा नगर हवेलीचे प्रशासक प्रफुल्ल खेडा यांच्यावर आरोप करण्यात आले होते. या प्रकरणामुळे भाजप संशयाच्या भोवऱ्यात अडकला होता. कालांतराने डेलकर कुटुंबीयांनी शिवसेनेत प्रवेश केला. 
 

Web Title: shiv sena aditya thackeray reaction on dadra and nagar haveli bypoll election result

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.