शेतकऱ्यांच्या देशव्यापी बंदला शिवसेनेचाही पाठिंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 04:04 AM2020-12-07T04:04:26+5:302020-12-07T04:04:26+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : पंजाब, हरयाणातील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला समर्थन जाहीर करतानाच, संयुक्त शेतकरी आघाडीने पुकारलेल्या ८ डिसेंबरच्या बंदलाही ...

Shiv Sena also supports farmers' nationwide bandh | शेतकऱ्यांच्या देशव्यापी बंदला शिवसेनेचाही पाठिंबा

शेतकऱ्यांच्या देशव्यापी बंदला शिवसेनेचाही पाठिंबा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : पंजाब, हरयाणातील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला समर्थन जाहीर करतानाच, संयुक्त शेतकरी आघाडीने पुकारलेल्या ८ डिसेंबरच्या बंदलाही शिवसेनेने पाठिंबा जाहीर केला आहे. शिवसेना नेते आणि मुख्य प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी ही माहिती दिली.

अकाली दलाच्या नेत्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन आंदोलनाबाबत चर्चा केली. त्यानंतर, रात्री उशिरा भारत बंदबाबत शिवसेनेने आपली अधिकृत भूमिका जाहीर केली. शेतकरी आंदोलकांनी देशव्यापी बंदची हाक दिली. हा बंद यशस्वी व्हावा, शेतकऱ्यांच्या मागण्यांचा आवाज जगभरात जावा, हीच शिवसेनेची भावना आहे. महाराष्ट्रातील परिस्थिती वेगळी आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शिवसेना, तसेच महाविकास आघाडी सरकारने सतत सकारात्मक, समन्वयाची भूमिका घेतल्याने पंजाब-हरयाणासारखी परिस्थिती महाराष्ट्रात उद्भवू शकत नाही, पण पंजाब-हरयाणाचा शेतकरी आंदोलनात उतरला हे केंद्राचे अपयश आहे. केंद्राच्या धोरणांविरुद्ध पुकारलेल्या बंदमागची भावना नाकारता येणार नाही. कोरोनामुळे देशच बंद असल्याची स्थिती वर्षभर होती, परंतु या संकटाच्या काळातही देशातील शेतकरी कर्तव्य भावनेने शेतावर राबत होता, हे विसरता येणार नाही. त्यामुळे शेतकरी आपल्या मागण्यांसाठी एक दिवसाचा बंद करत असतील, तर जनतेने स्वयंस्फूर्तीने बंदमध्ये सहभागी होऊन आपल्या अन्नदात्याच्या मागे ठामपणे उभे राहावे, असे आवाहन शिवसेनेतर्फे करण्यात आले आहे.

Web Title: Shiv Sena also supports farmers' nationwide bandh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.