विलेपार्ले व सहार येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर छत्री उभारण्याचा शिवसेना व भाजपाला पडला विसर !

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2018 08:18 PM2018-03-03T20:18:35+5:302018-03-03T20:18:35+5:30

शिवसेना विभाग क्र ४ व ५ च्या वतीने उद्या रविवार दि ४ मार्च रोजी सकाळी  ९:३० वाजता शिवजयंती सोहळा विलेपार्ले (पूर्व)पश्चिम द्रुतगतीमार्ग  सहार विमानतळाच्या जवळ आयोजित करण्यात आला आहे.

Shiv Sena and BJP forget to build umbrella on the statue of Vileparle and Sahar Chhatrapati Shivaji Maharaj! | विलेपार्ले व सहार येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर छत्री उभारण्याचा शिवसेना व भाजपाला पडला विसर !

विलेपार्ले व सहार येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर छत्री उभारण्याचा शिवसेना व भाजपाला पडला विसर !

googlenewsNext

- मनोहर कुंभेजकर

मुंबई - शिवसेना विभाग क्र ४ व ५ च्या वतीने उद्या रविवार दि ४ मार्च रोजी सकाळी  ९:३० वाजता शिवजयंती सोहळा विलेपार्ले (पूर्व)पश्चिम द्रुतगतीमार्ग  सहार विमानतळाच्या जवळ आयोजित करण्यात आला आहे.प्रति वर्षाप्रमाणे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे सकाळी ९:४५ मिनिटे या वेळी उपस्थित राहणार आहेत.तर मुंबईसह राज्यात शिवसेनेतर्फे शिवजयंती उत्सव मोठ्या दिमाखात साजरा केला जाणार आहे. विलेपार्ले (पूर्व ) पश्चिम दुर्तगती महामार्ग आणि अंधेरी(पूर्व) सहार वेअरहाऊस येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा 12 महिने ऊन व पाऊस झेलत आहे.

 मात्र त्याच्या डोक्यावर साधी संरक्षणासाठी छत्री देखिल नाही.लोकमतने सातत्याने हा विषय मांडला आहे.मात्र पूर्वीचा आणि आताच्या राज्य सरकारला याचा विसर पडला आहे.मात्र अजून येथे ना छत्री उभारली गेली ना म्युझियम अशी खंत वॉचडॉग फाउंडेशनचे विश्वस्त अँड.ग्राडफे पिमेंटा व निकोलस अल्मेडा यांनी व्यक्त केली.येथे पुतळ्याच्या तळघरात छत्रपती शिवाजी महाराजांचे म्युझियम उभारण्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली होती याची आठवण त्यांनी करून दिली.

 अरबी सुमुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारले जाईल अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलिकडेच केली होतो,तर या स्मारकाचे टेंडर एल अँड टी कंपनीला नुकतेच देण्यात आल्याची घोषणा राज्यसरकारने केली आहे.महाराष्ट्राचे आराध्य दैवत..छत्रपती शिवाजी महाराज अशी आपल्या भाषणाची सुरवात राजकीय पक्ष करतात,मग आपल्या आराध्य दैवताच्या सरंक्षणासाठी त्यांच्या डोक्यावर छत्री उभारून व येथे त्यांचे म्युझियम राज्य सरकार का करत नाही असा सवाल त्यांनी केला.

 अंधेरी (पूर्व) सहार वेअरहाऊस येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ रस्त्यानजिक आणि विलेपार्ले (पूर्व ) पश्चिम दुर्तगती महामार्गावर हनुमान रोडवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या परिसरात गेल्या 19 फेब्रुवारी शासकीय  शिवजयंती निमित्त सुशोभिकरण करण्याचा या दोन्ही पुतळ्याची देखभाल करणाऱ्या जिव्हीके कंपनीला विसर पडला तर शिवसेना भाजपाच्या आमदार व नगरसेवकांनी येथे पाठ फिरवली होती.मात्र दरम्यान गेल्या 19 फेब्रुवारी रोजी सहार गावातील 100 शिवप्रेमी व वॉचडॉग फाउंडेशन यांनी संयुक्तपणे सहार परिसरातील मार्केट, पाचपाखाडी मार्गे येथील वेअर हाऊस येथील असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्याया पुतळ्यापर्यंत बँडच्या निनादात शोभायात्रा काढली.छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा येथे ठेऊन शिवप्रतिमेला पुष्पहार घातला होता याची आठवण त्यांनी करून दिली.

1999 साली माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयीं आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सहार विमानतळासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा येथे बसवण्याचा कामाचे भूमिपूजन केले होते.तर 2004 साली त्यांच्या हस्ते येथे पुतळा बसवण्यात आला होता.मात्र सहार 2012 मध्ये तो शिफ्ट करून सध्या वेअरहाऊस येथे बसवण्यात आला आहे.

त्यामुळे पुन्हा सहार येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतर राष्ट्रीय विमानतळाची ओळख म्हणून जशी ऍडमिरल होराटीओ नेल्सन यांची आठवण म्हणून लंडन येथील ट्रफलगार स्केवर येथे असलेल्या  त्यांच्या ब्रॉंझच्या 169 फूट उंचीचा पुतळा बसवला आहे.त्याप्रमाणे सहार येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळा समोरील 5 एकर जागेत 100 फूट उंच  असा शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा बसवण्यात यावा अशी मागणी अँड. ग्राडफे पिमेंटा व निकोलस अल्मेडा यांनी  केली आहे.
 

गेल्या पालिका निवडणुकीपूर्वी शिवजयंतीच्या आदल्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपाने जोरदार शक्ति प्रदर्शन केले.तर शिवजयंतीच्या दिवशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेने जोरदार शक्ति प्रदर्शन केले होते.फक्त निवडणुकीपूर्वी येथे शिवजयंती राजकीय पक्ष येथे साजरी करतात का असा टोला त्यांनी लगावला.

 दरम्यान गेल्या 19 फेब्रुवारी रोजी सहार गावातील 100 शिवप्रेमी व वॉचडॉग फाउंडेशन यांनी संयुक्तपणे सहार परिसरातील मार्केट, पाचपाखाडी मार्गे येथील वेअर हाऊस येथील असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्याया पुतळ्यापर्यंत बँडच्या निनादात शोभायात्रा काढली.छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा येथे ठेऊन शिवप्रतिमेला पुष्पहार घातला होता याची आठवण त्यांनी करून दिली.

Web Title: Shiv Sena and BJP forget to build umbrella on the statue of Vileparle and Sahar Chhatrapati Shivaji Maharaj!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.