Join us

शिवसेना व धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटालाच मिळणार - अब्दुल सत्तार

By मनोहर कुंभेजकर | Published: October 19, 2022 5:03 PM

शिवसेना व धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटालाच मिळणार असा ठाम विश्वास राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी काल रात्री बोरीवलीत व्यक्त केला. 

मुंबई : आमच्याकडे ४० आमदार आणि १२ खासदार असून ७० टक्के संख्याबळ हे आमच्याकडे आहे. त्यामुळे आमच्याकडे ४० आमदार आणि १२ खासदार असून ७० टक्के संख्याबळ हे आमच्याकडे आहे. त्यामुळे शिवसेना व धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटालाच मिळणार असा ठाम विश्वास राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी काल रात्री बोरीवलीत व्यक्त केला. 

आम्ही ४० आमदार आणि १२ खासदार आणि १० अपक्ष आमदारांनी शिवसेना का सोडली, याचे आत्मपरीक्षण उद्धव ठाकरे यांनी करावे असा टोला त्यांनी लगावला. विभागक्रमांक एकचे विभागप्रमुख व मागाठाणेचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या देवीपाडा येथील शिवसेना शाखा क्रमांक १२च्या नव्या शाखेच्या उदघाटनप्रसंगी सुमारे हजारोंच्या संख्येने महिला, जेष्ठ नागरिक उपस्थित होते. माझ्या शिल्लोड मतदार संघात इतकी गर्दी होत नाही, फक्त येथील शाखेच्या उदघाटनाला आहे. त्यामुळे आगामी पालिका निवडणुकीत येथील नागरिक  त्यांच्यामागे खंबीरपणे उभे राहतील. आगामी महापालिका निवडणुकीत मागाठाणे मतदार संघात शिंदे गटाचा बोलबाला असेल असा ठाम विश्वास मंत्री अब्दुल सत्तार यांनी  येथे व्यक्त केला.

युवासेना कोअर कमिटी सदस्य राज प्रकाश सुर्वे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून येथील नव्या शाखेचा उदघाटन सोहळा त्यांच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मंत्र्यांच्या हस्ते २००० जेष्ठ नागरिकांना ब्लॅंकेट वाटपकरण्यात आले. मागाठाणेचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी या मतदार संघाचे प्रश्न सातत्याने मांडण्याचा प्रयत्न केला आहे.आता आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार राज्यात सत्तेवर आहे. त्यामुळेमुख्यमंत्र्यांनी सुमारे १५० कोटींचा निधी मागाठाणेच्या सर्वांगिण विकासाला दिला आहे.त्यामुळे आगामी काळात मागाठाणेचा चेहरा मोहरा बदलणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी आपल्या भाषणात आमदार प्रकाश सुर्वे म्हणाले की, येथील देवीपाड्याच्या आमचा गोविंदाचे जगात १४० देशात नाव झाले.आमच्या शिवसेना शाखा म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेले एक ठेवा असून,या न्याय मंदिरात येणाऱ्या १०० टक्के नागरिकांना न्याय मिळून त्यांच्या समस्या सुटणार आहेत. आज फक्त एका शाखेच्या उदघाटनाला मोठी गर्दी आहे.आमच्या कामाने मतदारांच्या हृदयात स्थान निर्माण करु अशी ग्वाही देत पालिका निवडणुका कधीही घ्या,आम्ही सज्ज असून आमच्या कामाने मतदारांच्या हृदयात स्थान निर्माण करून पालिका निवडणुका जिंकून दाखवू असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मागाठाणेच्या आगामी विविध विकास योजनांची माहिती देतांना आमदार प्रकाश सुर्वे म्हणाले की,येथील पाण्याची समस्या आपण विधानसभेत व नुकतीच डीपीडीसीच्या मिटींग मध्ये पालकमंत्र्यांकडे तसेच मुख्यमंत्री व उपमुख्य मंत्र्यांकडे मांडली असून सदर समस्या लवकरच मिटणार आहे. येथील एसआरए प्रकल्पातील नागरिकांना गेली तीन चार वर्षे भांडी मिळाली नाहीत.आपण सदर प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडला असून लवकरच याबाबतीत कायदा करण्यात येणार आहे.त्यामुळे एसआरए प्रकल्पातील नागरिकांना दोन वर्षाचे भाडे देण्यात येणार असून सदर रक्कम मग बिल्डरच्या सेल कॉपोनंट मधून कापण्यात येणार आहे अशी माहितीआमदार सुर्वे यांनी दिली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागाठाणेला १५० कोटींचा विकास निधी येथील जनतेच्या हितासाठी दिला आहे,त्यातील ८० कोटी निधी तर येथील रस्ते खड्डेमुक्त करून ते सिमेंटचे करण्यासाठी आहेत.तसेच येथील महिला व युवकांच्या हाताला काम मिळण्यासाठी ५००० ते ५ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज तुमच्या घरात आम्ही उपलब्ध करून देणार आहोत.येथील नागरिकांना तज्ञ डॉक्टरांचे उपचार मिळण्यासाठी येथे बाळासाहेब ठाकरे सुसज्ज आरोग्य चिकित्सा केंद्र उघण्यात येणार असून येथे तज्ञ डॉक्टर सर्व प्रकारच्या व्याधींवर उपचार करणार आहेत.तर नॅन्सी एसटी डेपोच्या जागेचा विकास करून सुसज्ज मॉडेल एसटी डेपो आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभरणार आहे. तर येथून भुयारी बोगदा करणार असल्याने बोरिवली ते ठाणे अंतर फक्त १० मिनिटांत पार करता येणार आहे अशी मागाठाणेच्या विकासाची ब्ल्यू प्रिंटच आमदार प्रकाश सुर्वे यांनी मांडली.

टॅग्स :अब्दुल सत्तारप्रकाश सुर्वे