Shiv Sena Candidate List : भाजपानंतर शिवसेनेकडून 70 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, अनेक 'आयारामां'ना तिकीट
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2019 02:40 PM2019-10-01T14:40:09+5:302019-10-01T14:42:16+5:30
Maharashtra Election 2019 Shivsena Candidates First List: 70 उमेदवारांची पहिली यादी जाहीर
मुंबई : भाजपापाठोपाठ शिवसेनेकडून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या 70 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत आदित्य ठाकरे यांचे नाव असून वरळी मतदार संघातून ते निवडणूक लढणार आहे.
या पहिल्या यादीत अनेक 'आयारामां'ना तिकीट देण्यात आले आहे. बीडमधून जयदत्त क्षीरसागर यांना तिकीट मिळाले आहे. तर, नालासोपाऱ्यातून एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. याशिवाय, गेल्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकून शिवसेनेत दाखल झालेल्या भास्कर जाधव यांना गुहागर मतदार संघातून उमेदवारी मिळाली आहे.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा आणि शिवसेना यांच्यात जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. त्यानुसार, भाजप 146, शिवसेना 124 आणि मित्रपक्षांसाठी 18 जागा सोडण्यात आल्या आहेत.
Maharashtra: Shiv Sena Chief Uddhav Thackeray hands over the AB form (party's nomination of the candidate) to Aditya Thackeray. Aditya will file his nomination from the Worli Assembly constituency in Mumbai on 3rd October, for the upcoming #MaharashtraAssemblyPollspic.twitter.com/u4vN702VPi
— ANI (@ANI) October 1, 2019
शिवसेना उमेदवारांची नावे....
नांदेड दक्षिण - राजश्री पाटील
मुरुड - महेंद्र शेठ दळवी
हदगाव - नागेश पाटील आष्टीकर
मुंबादेवी - पांडुरंग सकपाळ
भायखळा - यामिनी जाधव
गोवंडी - विठ्ठल लोकरे
एरोंडेल/ पारोळा - चिमणराव पाटील
वडनेरा - प्रीती संजय
श्रीवर्धन - विनोद घोसाळकर
कोपर पाचकपडी - एकनाथ शिंदे
वैजापूर - रमेश बोरनावे
शिरोळ - उल्हास पाटील
गंगाखेड - विशाल कदम
दापोली - योगेश कदम
गुहागर - भास्कर जाधव
अंधेरी पूर्व - रमेश लटके
कुडाळ - वैभव नाईक
ओवला माजीवाडे - प्रताप सरनाईक
बीड - जयदत्त क्षीरसागर
पार ठाणे - सांदीपान भुमरे
शहापूर - पांडुरंग बरोला
नगर शहर - अनिलभैय्या राठोड
सिल्लोड - अब्दुल सत्तार
औरंगाबाद (दक्षिण) - संजय शिरसाट
अक्कलकुवा - आमशा पडवी
इगतपुरी - निर्मला गावित
वसई - विजय पाटील
नालासोपारा - प्रदीप शर्मा
सांगोला - शाबजी बापू पाटील
कर्जत - महेंद्र थोरवे
धन सावंगी - डॉ.हिकमत दादा उधन
खानापूर - अनिल बाबर
राजापूर - राजन साळवी
करवीर - चंद्रदीप नरके
बाळापूर - नितीन देशमुख
देगलूर - सुभाष सबणे
उमरगा लोहारा - ज्ञानराज चौगुले
डिग्रस - संजय राठोड
परभणी - डॉ.राहुल पाटील
मेहकर - डॉ.संजय रायमुलकर
जालना - अर्जुन खोतकर
कळमनुरी - संतोष बांगर
कोल्हापूर उत्तर - राजेश क्षीरसागर
औरंगाबाद (पश्चिम)- संजय शिरसाट
चंदगड (कोल्हापूर)- संग्राम कुपेकर
वरळी - आदित्य ठाकरे
शिवडी - अजय चौधरी
इचलकरंजी - सुजित मिणचेकर
राधानगरी - प्रकाश आबिटकर
पुरंदर - विजय शिवतारे
दिंडोशी - सुनील प्रभु
जोगेश्वरी पूर्व - रवी वायकर
मागठाणे - प्रकाश सुर्वे
गोवंडी - विठ्ठल लोकरे
विक्रोळी - सुनील राऊत
अनुशक्ती नगर - तुकाराम काटे
चेंबूर - प्रकाश फतारपेकर
कुर्ला - मंगेश कुडाळकर
कलिना - संजय पोतनीस
माहीम - सदा सारवणकर
जळगाव ग्रामीण - गुलाबराव पाटील
पाचोरा - किशोर पाटील
मालेगाव - दादाजी भुसे
सिन्नर - राजाभाऊ वझे
निफाड - अनिल कदम
देवळाली - योगेश घोलप
खेड - आळंदी - सुरेश गोरे
पिंपरी - गौतम चाबुकस्वार
येवला - संभाजी पवार
नांदगाव - सुहास खांडे