Join us

Shiv Sena Candidate List : भाजपानंतर शिवसेनेकडून 70 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, अनेक 'आयारामां'ना तिकीट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2019 2:40 PM

Maharashtra Election 2019 Shivsena Candidates First List: 70 उमेदवारांची पहिली यादी जाहीर

मुंबई : भाजपापाठोपाठ शिवसेनेकडून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या 70 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत आदित्य ठाकरे यांचे नाव असून वरळी मतदार संघातून ते निवडणूक लढणार आहे.

या पहिल्या यादीत अनेक 'आयारामां'ना तिकीट देण्यात आले आहे. बीडमधून जयदत्त क्षीरसागर यांना तिकीट मिळाले आहे. तर, नालासोपाऱ्यातून एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. याशिवाय, गेल्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकून शिवसेनेत दाखल झालेल्या भास्कर जाधव यांना गुहागर मतदार संघातून उमेदवारी मिळाली आहे. 

दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा आणि शिवसेना यांच्यात जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. त्यानुसार, भाजप 146, शिवसेना 124 आणि मित्रपक्षांसाठी 18 जागा सोडण्यात आल्या आहेत. 

शिवसेना उमेदवारांची नावे....

नांदेड दक्षिण - राजश्री पाटीलमुरुड - महेंद्र शेठ दळवीहदगाव - नागेश पाटील आष्टीकरमुंबादेवी - पांडुरंग सकपाळभायखळा - यामिनी जाधवगोवंडी - विठ्ठल लोकरेएरोंडेल/ पारोळा - चिमणराव पाटीलवडनेरा - प्रीती संजयश्रीवर्धन - विनोद घोसाळकरकोपर पाचकपडी - एकनाथ शिंदेवैजापूर - रमेश बोरनावेशिरोळ - उल्हास पाटीलगंगाखेड - विशाल कदमदापोली - योगेश कदमगुहागर - भास्कर जाधवअंधेरी पूर्व - रमेश लटकेकुडाळ - वैभव नाईकओवला माजीवाडे - प्रताप सरनाईकबीड - जयदत्त क्षीरसागरपार ठाणे - सांदीपान भुमरेशहापूर - पांडुरंग बरोलानगर शहर - अनिलभैय्या राठोडसिल्लोड - अब्दुल सत्तारऔरंगाबाद (दक्षिण) - संजय शिरसाटअक्कलकुवा - आमशा पडवीइगतपुरी - निर्मला गावितवसई - विजय पाटीलनालासोपारा - प्रदीप शर्मासांगोला - शाबजी बापू पाटीलकर्जत - महेंद्र थोरवेधन सावंगी - डॉ.हिकमत दादा उधनखानापूर - अनिल बाबरराजापूर - राजन साळवीकरवीर - चंद्रदीप नरकेबाळापूर - नितीन देशमुखदेगलूर - सुभाष सबणेउमरगा लोहारा - ज्ञानराज चौगुलेडिग्रस - संजय राठोडपरभणी - डॉ.राहुल पाटीलमेहकर - डॉ.संजय रायमुलकरजालना - अर्जुन खोतकरकळमनुरी - संतोष बांगरकोल्हापूर उत्तर - राजेश क्षीरसागरऔरंगाबाद (पश्चिम)- संजय शिरसाटचंदगड (कोल्हापूर)- संग्राम कुपेकरवरळी - आदित्य ठाकरेशिवडी - अजय चौधरीइचलकरंजी - सुजित मिणचेकरराधानगरी - प्रकाश आबिटकरपुरंदर - विजय शिवतारेदिंडोशी - सुनील प्रभुजोगेश्वरी पूर्व - रवी वायकरमागठाणे - प्रकाश सुर्वेगोवंडी - विठ्ठल लोकरेविक्रोळी - सुनील राऊतअनुशक्ती नगर - तुकाराम काटेचेंबूर - प्रकाश फतारपेकरकुर्ला - मंगेश कुडाळकरकलिना - संजय पोतनीसमाहीम - सदा सारवणकरजळगाव ग्रामीण - गुलाबराव पाटीलपाचोरा - किशोर पाटीलमालेगाव - दादाजी भुसेसिन्नर - राजाभाऊ वझेनिफाड - अनिल कदमदेवळाली - योगेश घोलपखेड - आळंदी - सुरेश गोरेपिंपरी - गौतम चाबुकस्वारयेवला - संभाजी पवारनांदगाव - सुहास खांडे

टॅग्स :शिवसेनाविधानसभा निवडणूक 2019आदित्य ठाकरेउद्धव ठाकरेमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019वरळी