Join us

"राजस्थानमध्ये भाजपाची ‘केला तुका झालां माका’ अशी अवस्था"

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2020 7:44 AM

भाजपाकडून अशोक गहलोत यांच्या नेतृत्वाखालील सरकार पाडण्यासाठी करण्यात येत असलेल्या हालचालींवर आज शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून जोरदार टीका करण्यात आली आहे.

ठळक मुद्देसचिन पायलट यांचे अन्यायाविरुद्ध बंड हे खोटे होते याचा पर्दाफाश मुख्यमंत्री गहलोत यांनी केलासरकार पाडण्यासाठीचा केंद्रीय सत्तेचा दबाव आणि पैशांचा वापर काँग्रेसने उधळून लावलासचिन पायलट यांच्या बंडामागे नीतिमत्ता कमी आणि पैशाची फूस जास्त होती

 मुंबई - राजस्थानमध्ये सध्या काँग्रेस पक्षात अंतर्गत लढाई सुरू आहेत. तसेच कांग्रेसमध्ये नाराज असलेल्या सचिन पायलट यांच्या बंडाला भाजपाकडून खतपाणी घालण्यात येत आहे. दरम्यान, भाजपाकडून अशोक गहलोत यांच्या नेतृत्वाखालील सरकार पाडण्यासाठी करण्यात येत असलेल्या हालचालींवर आज शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून जोरदार टीका करण्यात आली आहे.

भाजपासोबत सचिन पायलट यांची जी सौदेबाजी सुरू होती ती पैशांच्या देवाणघेवाणीच्या टोकापर्यंत होती. म्हणजेच गहलोत सरकार पैसे चारून पाडायचे, घोडेबाजार करून बहुमत विकत घ्यायचे हे ठरले होते. सचिन पायलट यांचे अन्यायाविरुद्ध बंड हे खोटे होते याचा पर्दाफाश मुख्यमंत्री गहलोत यांनी केला असून, त्यासाठी पायलट आणि भाजपा नेत्यांमधील फोन संभाषण समोर आणले आहे. सरकार पाडण्यासाठीचा केंद्रीय सत्तेचा दबाव आणि पैशांचा वापर काँग्रेसने उधळून लावला, असा टोला सामनातील अग्रलेखातून भाजपाला लगावला आहे.

सचिन पायलट यांच्या बंडामागे नीतिमत्ता कमी आणि पैशाची फूस जास्त होती, हा जनता आणि लोकशाहीशी द्रोह आहे. हा भ्रष्टाचारच आहे. गहलोत सरकारने पुराव्यांच्या आधारे केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. फोनवरील संभाषण ऐकणे, पाळत ठेवणे हे जितके बेकायदेशीर आहे, तितकेच सरकार पाडण्यासाठी आमदार विकत घेणेही गुन्हेगारी स्वरूपाचे कृत्य आहे. राजस्थानात राष्ट्रपती राजवटीची मागणी करणाऱ्यांनी अद्याप केंद्रीय मंत्र्यांचा राजीनामा का घेतला नाही. आधी शेखावत यांचा राजीनामा घ्या, आमदार खरेदीबाबत प्रायश्चित घ्या, मग गलहोत सरकारकडे बोट दाखवा, असा सल्लाही सामनामधून भाजपाला दिला आहे.

राजस्थान प्रकरणात भाजपाची अवस्था केले तुका झाले माका अशी झालेली आहे. मात्र काँग्रेस पक्षावर, त्यांच्या कार्यपद्धतीवर फुले उधळण्याची आवश्यकता नाही. त्यांच्यात अंतर्गत कलह किंवा जुने नवे वाद आहेत, ते संपणारे नाही. राहुल गांधी यांना यश मिळवू द्यायचे नाही, यासाठी जणू हे वाद काही ठराविक मंडळींकडून ठरवून काढले जातात. मध्य प्रदेश त्यातूनच गेले. राजस्थान तूर्त बचावले. राजस्थानातील फोन टॅपिंगने अनेकांचे पितळ उघडे पडले. पण काँग्रेस पुढाऱ्यांचे आपसातील संभाषण कुणी चोरून ऐकले आणि ते राहुल गांधी यांच्यापर्यंत पोहोचवले तरी बरेच गौप्यस्फोट होतील. राहुल गांधी यांना धड काम करू द्याचयेच नाही असा विडाच काही जणांनी उचलला आहे. याचा फटका समस्त विरोधी पक्षाला बसत आहे. फोन टॅपिंग हा गुन्हा आणि व्यक्तिगत स्वातंत्र्यावरील आघात आहेच. मात्र लोकशाही मार्गाने सत्तेवर आळेले सरकार पैशाच्या बळावर पाडणे हा घटनाद्रोह आहे. त्यामुळे कोणता गुन्हा मोठा हे ठरवायला हवे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

coronavirus: धक्कादायक! कोरोनाच्या रिपोर्टमध्ये केले गोलमाल, डॉक्टर झाला मालामाल

भारतानंतर आता या देशाने चीनला दाखवली सैनिकी तादक, घुसखोरीला चोख प्रत्युत्तर देण्याचा दिला इशारा

 महिंद्रांनी सुरक्षा दलांसाठी आणले दणकट चिलखती अस्र; आता माओवादी, दहशतवाद्यांची खैर नाही

…म्हणून भारतातील दहा पैकी तीन कोरोना रुग्ण करू शकत नाहीत प्लाझ्मा दान

coronavirus: कोरोनाबाधित रुग्णाचे तब्बल दीड कोटींचे बिल केले माफ, तिकीट देऊन केली मायदेशी पाठवणी

गेल्या सहा महिन्यांत कोरोनाबाबत तज्ज्ञांना मिळाली ही महत्त्वाची माहिती, लस आणि हर्ड इम्युनिटीबाबत मिळाले असे संकेत…

टॅग्स :शिवसेनाभाजपाकाँग्रेस