शिवसेना हीच राष्ट्रवादी काँग्रेसची 'बी टीम' झालीय; शिवसेनेच्या टीकेवर मनसेचा टोला 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2020 09:56 AM2020-02-09T09:56:22+5:302020-02-09T09:58:18+5:30

पाकिस्तानी, बांग्लादेशी यांना हाकलून लावा ही मनसेची मागणी आहे.

Shiv Sena is the 'B team' of NCP; MNS Reaction on Shiv Sena criticizes | शिवसेना हीच राष्ट्रवादी काँग्रेसची 'बी टीम' झालीय; शिवसेनेच्या टीकेवर मनसेचा टोला 

शिवसेना हीच राष्ट्रवादी काँग्रेसची 'बी टीम' झालीय; शिवसेनेच्या टीकेवर मनसेचा टोला 

Next
ठळक मुद्देसर्वसामान्य नागरिक देशभक्त म्हणून मोर्चात सहभागी होणारपाकिस्तानी, बांग्लादेशी यांना हाकलून लावा ही मनसेची मागणीशिवसेनेच्या पायाखालची जमीन सरकली आहे म्हणून मनसेवर टीका करतेय

मुंबई - मनसेचा मोर्चा हा भाजपा पुरस्कृत आहे, त्यामुळे मनसेच्या मोर्चाचा कुठेही शिवसेनेवर परिणाम होणार नाही अशी टीका शिवसेना आमदार मनिषा कायंदे यांनी केली होती. त्यावर मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी प्रत्युत्तर देत शिवसेना ही राष्ट्रवादी काँग्रेसची बी टीम झाली आहे, त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे म्हणून शिवसेनेकडून टीका करण्यात येत आहे असा टोला त्यांनी शिवसेनेला लगावला आहे. 

मनसे मोर्चाबाबत बोलताना संदीप देशपांडे म्हणाले की, मनसेच्या महामोर्चासाठी मनसे कार्यकर्त्यांकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. सोशल मीडिया असेल वा चौकसभा सर्व माध्यमातून आम्ही लोकांना मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. सकाळी १०.३० वाजता प्रभू रामचंद्राची आरती करून मनसेचे कार्यकर्ते हिंदू जिमखाना, गिरगाव चौपाटी येथे जमा होणार आहे. मनसेच्या मोर्चासाठी फक्त कार्यकर्ते नव्हे तर सर्वसामान्य नागरिक देशभक्त म्हणून सहभागी होत आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच पाकिस्तानी, बांग्लादेशी यांना हाकलून लावा ही मनसेची मागणी आहे. या मोर्चासाठी कोणताही राजकीय पक्षाचा अभिनिवेश न बाळगता अनेक कार्यकर्ते सहभागी होणार आहे. गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश याठिकाणाहून काही लोकं मोर्चात सहभागी होणार आहे. हा मोर्चा ऐतिहासिक होणार आहे असा दावा संदीप देशपांडे यांनी केला आहे. 

मनसेच्या मोर्चाचा शिवसेनेला फटका बसणार नाही, बाळासाहेब ठाकरे यांचेच मुद्दे मनसे पुढे घेऊन जात आहे, पाकिस्तानी, बांग्लादेशी हे मुद्दे आत्ताच का आठवले? गेली १४ वर्ष मनसे कुठे होती? मनसेची भूमिका सतत बदलणारी आहे. त्याचसोबत काही दिवसांपूर्वी शहा-मोदी यांना राजकीय पटलावरुन बाजूला फेका असं टोकाचा विरोध केला आता सौम्य झाले आहेत हे लोकांना दिसतं. भाजपाला कधीच महाराष्ट्रात स्वबळावर सत्ता आणता येत नाही, त्यांना दुसऱ्या पक्षाच्या कुबड्या कायम लागतात. पहिलं वंचितला सोबत घेण्याचा प्रयत्न केला आता मनसेला घेतायेत. भाजपाचे आशिष शेलार वारंवार कृष्णकुंजला भेटीगाठी करतात, त्यानंतर हा मोर्चा निघतो, या मोर्चामागे भाजपाचा हात आहे असा आरोप शिवसेना आमदार मनिषा कायंदे यांनी केला होता. त्यावरुन मनसेने शिवसेनेला चोख प्रत्युत्तर दिलं आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

मनसे मोर्चाच्या बसवर भाजपा आमदाराचं नाव; मोर्चानिमित्त मनसे-भाजपा कार्यकर्ते एकत्र?

MNS Morcha Live: मनसेचा महामोर्चा : मोर्चाच्या बसेसवर भाजपा आमदारांचं नाव, चर्चेला उधाण!

...म्हणूनच 'याचे' श्रेय गांधी-नेहरु अन् पटेलांसारख्या काँग्रेस नेत्यांना जाते - शिवसेना नेते संजय राऊत 

मनसेचा महामोर्चा भाजपा पुरस्कृत; शिवसेनेची राज ठाकरेंवर जहरी टीका 

हिंदू जिमखाना ते आझाद मैदान... 'मनसे'चा महामोर्चा, पोलिसांची करडी नजर

Web Title: Shiv Sena is the 'B team' of NCP; MNS Reaction on Shiv Sena criticizes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.