Maharashtra Election 2019 : शिवसेना-भाजपा युती जवळपास 225च्या आसपास जागा जिंकतील- पीयूष गोयल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2019 09:36 AM2019-10-21T09:36:04+5:302019-10-21T09:51:28+5:30
विधानसभा निवडणुकीसाठी मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघांमध्ये आज मतदान पार पडत आहे.
मुंबईः विधानसभा निवडणुकीसाठी मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघांमध्ये आज मतदान पार पडत आहे. यासाठी प्रशासनातर्फे जय्यत तयारी करण्यात आली आहे. निवडणुकीत मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघांतून 333 उमेदवार नशीब आजमावत असून त्यात शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्यासह भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, समाजवादी पार्टी, एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांचा समावेश आहे.
सकाळी 7 वाजता मतदानाला प्रारंभ झाला असून, सायंकाळी 6 वाजता मतदान केंद्रातील रांगेत उभ्या असलेल्या मतदाराचे मतदान होईपर्यंत ही प्रक्रिया चालेल. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनीही मुंबईत मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, शिवसेना आणि भाजपा युती जवळपास 225च्या आसपास जागा जिंकतील, विरोधकांनी आपली विश्वासार्हता केव्हाच गमावली आहे. ते कोठेही दिसत नाहीत. जनता मोदीजी आणि फडणवीसजी यांच्यासोबत आहे. मुंबई पोलीस दलातील 40 हजार पोलीस अधिकारी आणि अंमलदार तैनात असून, त्यासोबत केंद्रीय सुरक्षा बलाच्या 22 कंपन्या, एसआरपीएफच्या 12 प्लॅटून, आरपीएफच्या 4 प्लॅटून आणि 2700 होमगार्डही तैनात राहतील.
Union Minister Piyush Goyal in Mumbai: I am confident that the BJP-Shiv Sena alliance will win around 225 seats, opposition has lost all credibility and is nowhere in the contest. People are with Modi ji and Fadnavis ji. #MaharashtraAssemblyPollspic.twitter.com/ut0RRhJqyU
— ANI (@ANI) October 21, 2019