शिवसेना-भाजपा आले आमनेसामने

By admin | Published: April 5, 2016 02:17 AM2016-04-05T02:17:10+5:302016-04-05T02:17:10+5:30

महापालिकेची आगामी निवडणूक स्वबळावर लढविण्याच्या तयारीत असलेल्या भाजपाला शिवसेनेने त्याआधीच दणका दिला आहे़ प्रभाग समितीच्या निवडणुकीत भाजपा

Shiv Sena-BJP came to power | शिवसेना-भाजपा आले आमनेसामने

शिवसेना-भाजपा आले आमनेसामने

Next

मुंबई : महापालिकेची आगामी निवडणूक स्वबळावर लढविण्याच्या तयारीत असलेल्या भाजपाला शिवसेनेने त्याआधीच दणका दिला आहे़ प्रभाग समितीच्या निवडणुकीत भाजपा उमेदवाराविरोधात शिवसेनेने दंड थोपटले आहेत़ आठपैकी तीन प्रभागांमध्ये शिवसेना-भाजपा युतीचे उमेदवार अध्यक्षपदासाठी आमने-सामने आहेत़ शिवसेनेच्या या भूमिकेमुळे मंगळवारी होणारी स्थायी व शिक्षण समिती अध्यक्षपदाची निवडणूक चुरशीची होण्याची चिन्हे आहेत़
पालिकेच्या १७ प्रभागांपैकी आठ प्रभागांच्या अध्यक्षपदाची निवडणूक
७ एप्रिल रोजी पार पडणार आहे़ या प्रभागांमध्ये अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा सोमवार हा अखेरचा दिवस होता़ आगामी महापालिका निवडणूक स्वबळावर लढविण्याचे संकेत भाजपाने दिले आहेत़ त्यामुळे प्रभाग समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीविषयी उत्सुकता होती़
सी आणि डी, पी उत्तर आणि आर उत्तर व आर मध्य या तीन प्रभागांमध्ये शिवसेनेने भाजपाविरोधात उमेदवारी अर्ज दाखल केला आहे़ त्यामुळे या निवडणुकांमध्ये युतीमध्येच फूट पडल्याचे चित्र आहे़ शिवसेनेच्या या खेळीमुळे शिक्षण व स्थायी समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपा काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Shiv Sena-BJP came to power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.