शिवसेना-भाजपाने निधी वळवला

By admin | Published: February 24, 2016 03:25 AM2016-02-24T03:25:27+5:302016-02-24T03:25:27+5:30

सत्तेच्या जोरावर शिवसेना-भाजपा युतीने पुन्हा एकदा अर्थसंकल्पातील मोठा निधी आपल्या पक्षातील नगरसेवकांकडे वळविला आहे़ नगरसेवक निधी व विकास निधी वगळता पक्षांतर्गत

The Shiv Sena-BJP has funded the funds | शिवसेना-भाजपाने निधी वळवला

शिवसेना-भाजपाने निधी वळवला

Next

मुंबई : सत्तेच्या जोरावर शिवसेना-भाजपा युतीने पुन्हा एकदा अर्थसंकल्पातील मोठा निधी आपल्या पक्षातील नगरसेवकांकडे वळविला आहे़ नगरसेवक निधी व विकास निधी वगळता पक्षांतर्गत निधी वाटपात अन्य राजकीय पक्षांच्या तोंडाला यंदाही पाने पुसण्यात आली आहेत़ त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर असमान निधी वाटपाचा मुद्दा पुन्हा एकदा गाजणार आहे़
वॉर्डातील विकासकामांसाठी नगरसेवकांना विकास निधी देण्यात येतो़ सन २०१६-२०१७ च्या अर्थसंकल्पात विकास निधी अंतर्गत १७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे़
स्थायी समितीमध्ये आज अर्थसंकल्प मंजूर करताना यामध्ये आणखी २१० कोटींची सुधारित तरतूद करण्यात आली आहे़ या निधीचे वाटप २२७ नगरसेवकांमध्ये समान होणार आहे़
मात्र राजकीय पक्षांना आगामी वर्षात देण्यात येणाऱ्या निधीमध्ये शिवसेना-भाजपाने मोठा वाटा आपल्याकडे राखून ठेवला आहे़ आगामी महापालिका निवडणुकीच्या काळात या निधीतून मोठी विकासकामे आपल्या वॉर्डात करून घेणे युतीच्या नेत्यांना शक्य होणार आहे़ त्यामुळे विरोधी पक्षांमध्ये संतापाची लाट उसळली आहे़ निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून युतीने हा खेळ खेळला असल्याचा आरोप विरोधी पक्ष करीत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: The Shiv Sena-BJP has funded the funds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.