Shiv sena: शिंदेंसह १२ जणांची आमदारकी रद्द करा, शिवसेनेचे विधानसभा उपाध्यक्षांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2022 07:59 AM2022-06-24T07:59:53+5:302022-06-24T08:00:34+5:30

Maharashtra Political Crisis: शिवसेनेच्या बंडखोर १२ आमदारांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करण्याची मागणी शिवसेनेने गुरुवारी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे केली.

Shiv sena: Cancel 12 MLAs including Eknath Shinde, Shiv Sena letter to assembly vice president | Shiv sena: शिंदेंसह १२ जणांची आमदारकी रद्द करा, शिवसेनेचे विधानसभा उपाध्यक्षांना पत्र

Shiv sena: शिंदेंसह १२ जणांची आमदारकी रद्द करा, शिवसेनेचे विधानसभा उपाध्यक्षांना पत्र

Next

मुंबई : शिवसेनेच्या बंडखोर १२ आमदारांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करण्याची मागणी शिवसेनेने गुरुवारी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे केली. त्यासाठी दिलेल्या पत्रामध्ये एकनाथ शिंदे, तानाजी सावंत, प्रकाश आबिटकर, बालाजी किणीकर, अनिल बाबर, लता सोनवणे, यामिनी जाधव, संजय शिरसाठ, संदीपान भुमरे, महेश शिंदे, भरत गोगावले आणि अब्दुल सत्तार यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी आहे. शिवसेनेने बोलाविलेल्या बैठकीला हे सदस्य उपस्थित नसल्याने त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.

एकनाथ शिंदेंसोबत असलेले शिवसेनेचे आमदार
१) एकनाथ शिंदे २) अनिल बाबर ३) शंभूराजे देसाई ४) महेश शिंदे ५) शहाजी पाटील ६) महेंद्र थोरवे, ७) भरत गोगावले ८) महेंद्र दळवी, ९) प्रकाश आबिटकर १०) डॉ. बालाजी किणीकर ११) ज्ञानराज चौगुले १२) प्रा. रमेश बोरनारे १३) तानाजी सावंत १४) संदीपान भुमरे १५) अब्दुल सत्तार १६) प्रकाश सुर्वे १७) बालाजी कल्याणकर १८) संजय शिरसाठ १९) प्रदीप जयस्वाल २०) संजय रायमुलकर २१) संजय गायकवाड २२) विश्वनाथ भोईर २३) शांताराम मोरे २४) श्रीनिवास वनगा २५) किशोरअप्पा पाटील २६) सुहास कांदे २७) चिमणआबा पाटील २८) लता सोनावणे २९) प्रताप सरनाईक ३०) यामिनी जाधव ३१) योगेश कदम ३२) गुलाबराव पाटील ३३) मंगेश कुडाळकर ३४) सदा सरवणकर ३५) दीपक केसरकर ३६) दादा भुसे आणि ३७) संजय राठोड.

अपक्ष व लहान पक्षांचे आमदार
१) बच्चू कडू २) राजकुमार पटेल ३) राजेंद्र यड्रावकर ४) चंद्रकांत पाटील ५) नरेंद्र भोंडेकर ६) मंजुळा गावित
 

Web Title: Shiv sena: Cancel 12 MLAs including Eknath Shinde, Shiv Sena letter to assembly vice president

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.