शिवसेना उपविभागप्रमुख गोळीबार प्रकरणात दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2019 06:44 AM2019-12-26T06:44:20+5:302019-12-26T06:44:26+5:30

विक्रोळी पोलिसांची कारवाई; गँगस्टर प्रसाद पुजारीच्या सांगण्यावरून हल्ला केल्याचे तपासात उघड

 Shiv Sena chief arrested in firing case | शिवसेना उपविभागप्रमुख गोळीबार प्रकरणात दोघांना अटक

शिवसेना उपविभागप्रमुख गोळीबार प्रकरणात दोघांना अटक

Next

मुंबई : विक्रोळीतील शिवसेना उपविभागप्रमुख चंद्रशेखर जाधव यांच्यावर गँगस्टर प्रसाद पुजारीच्या सांगण्यावरून गोळीबार करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यानुसार, या प्रकरणी एकाला मध्य प्रदेश तर दुसऱ्याला ठाणे येथून विक्रोळी पोलिसांनी अटक केली आहे. कृष्णधर सिंग आणि आनंद फडतरे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

विक्रोळीतील रहिवासी असलेले जाधव यांच्यावर १९ डिसेंबर रोजी मंदिराच्या आवारातच गोळीबार करण्यात आला होता. जाधव विक्रोळीचे आमदार सुनील राऊत यांचे निकटवर्तीय मानले जातात. विक्रोळीतील म्हाडा किंवा अन्य शासकीय, खासगी इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न, त्यातील विविध कंत्राटे, लोकप्रतिनिधींच्या निधीतून केल्या जाणाºया विविध योजना आदींची जबाबदारी जाधव पाहात
होते. येथील संघटित गुन्हेगारी टोळीचा म्होरक्या प्रसाद पुजारी याने जाधव यांना अनेकदा धमकावले होते, अशी माहिती यापूर्वी पोलिसांच्या हाती लागली होती. त्यानुसार, पोलीस या प्रकरणाची शहानिशा करत होते.

हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करत हा गुन्हा तपासासाठी गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाकडे वर्ग करण्यात आला. त्यानंतर, गुन्हे प्रकटीकरणचे पोलीस उपायुक्त शहाजी उमप यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय सावंत यांनी तपास सुरू केला. पथकाने ताब्यात घेतलेला आरोपी सागर मिश्रा हा जखमी असल्याने बोलण्याच्या स्थितीत नव्हता. त्यातही तो खोटी माहिती देत असल्याने तपासात अडथळा निर्माण होत होता. पुढे आरोपीकडून हस्तगत केलेल्या रिव्हॉल्वरवरून पथकाने शोध सुरू केला. त्याच्याकडील रिव्हॉल्वर कानपूर आॅर्डनन्स फॅक्टरीतील असल्याचे समजताच पथकाने तोच धागा पकडून चौकशी सुरू केली. त्यातूनच मध्य प्रदेश, कर्नाटक कनेक्शन समोर येताच तपास पथक तेथे गेले. मध्य प्रदेशातून कृष्णधर सिंग, तर ठाणे येथून आनंद फडतरेला ताब्यात घेतले. त्यांच्या चौकशीत त्यांनी परदेशात तळ ठोकून असलेल्या गँगस्टर प्रसाद पुजारीने सिंग व सागर मिश्राला गोळीबार करण्यासाठी मुंबईत पाठविल्याचे समोर आले.
मुंबईत पोहोचल्यावर त्याच्या एका साथीदाराने दोघांची राहण्याची व्यवस्था केली. पुढे फडतरेने त्यांना वाहन क्रमांक नसलेली दुचाकी दिली. त्यानुसार, ती दुचाकी घेऊन आरोपींनी जाधव यांच्यावर गोळीबार केला. त्यानुसार, दोघांनाही
यात अटक करण्यात आली. न्यायालयाने त्यांना १ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

दहशत निर्माण करण्यासाठी हल्ला
पुजारीकडून दहशत निर्माण करण्यासाठी हा हल्ला करण्यात आल्याची प्राथमिक माहिती तपासात समोर येत आहे. त्यानुसार, तपास पथकाकडून याप्रकरणी अधिक तपास करण्यात येत आहे.

 

Web Title:  Shiv Sena chief arrested in firing case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.