मुंबई - भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी आज संध्याकाळी बोलावलेली एनडीएतील मित्रपक्षांची बैठक आणि मेजवानीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीबाबत निर्माण झालेला संभ्रम संपुष्टात आला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एनडीएच्या बैठकीला आणि मेजवानीला उपस्थित राहणार आहेत. लोकसभा निवडणुकीचा प्रचार आटोपल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आपल्या कुटुंबीयांसह परदेश दौऱ्यावर गेले होते. ते आज मुंबईत परतले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी प्रताप सरनाईक यांच्या मुलाच्या विवाहास उपस्थिती लावली. मात्र उद्धव ठाकरे हे संध्याकाळी होणाऱ्या एनडीएच्या बैठकीला उपस्थित राहणार का? याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. त्यातच उद्धव ठाकरेंऐवजी शिवसेनेचा कुणी प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित राहील असे सूत्रांकडून सांगितले गेले. त्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आले होते. मात्र परदेशातून आल्याने उद्धव ठाकरे बैठकीस उपस्थित राहू शकणार नाहीत. त्यामागे कुठलीही नाराजी नाही, असेही शिवसेनेकडून स्पष्ट करण्यात आले. अखेरीस उद्धव ठाकरे हे आज संध्याकाळी होणाऱ्या एनडीएच्या बैठकीस उपस्थित राहतील, हे स्पष्ट झाले.
अखेर ठरलं! उद्धव ठाकरे एनडीएच्या मेजवानीसाठी दिल्लीत जाणार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2019 3:30 PM