त्यावेळी मला ठेका धरावासा वाटला होता; उद्धव ठाकरेंनी सांगितली आठवण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2019 05:49 PM2019-01-12T17:49:52+5:302019-01-12T17:53:43+5:30
ठाकरे चित्रपटाचा म्युझिक लॉन्च सोहळा संपन्न
मुंबई: ठाकरे चित्रपटाचा म्युझिक लॉन्च सोहळा आज संपन्न झाला. या सोहळ्याला चित्रपटात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका साकारणारे नवाजुद्दीन सिद्दीकी, अभिनेत्री अमृता राव यांच्यासह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते. यावेळी उद्धव यांनी चित्रपटाच्या मेकिंगच्या काही आठवणी सांगितल्या.
ठाकरे चित्रपटातील 'आया रे सबका बापरे, कहते है उसको ठाकरे...' हे हिंदी गाणं आजच्या दिमाखदार सोहळ्यात लॉन्च करण्यात आलं. या गाण्याला यूट्यूबवर लोकांची पसंती मिळताना दिसते आहे. अवघ्या 5 तासांमध्ये 85 हजार लोकांनी हे गाणं पाहिलं आहे. नकाश अजीननं हे गाणं गायलं आहे. 'ते गाणं ऐकताना मला थोडं भान ठेवावं लागलं. कारण त्यावेळी मला गाण्यावर ठेका धरावासा वाटला होता,' अशी गाण्याच्या मेकिंगची आठवण उद्धव यांनी लॉन्चवेळी सांगितली.
ठाकरे चित्रपट सुरुवातीला सेन्सॉरमध्ये अडकला होता. मात्र त्यानंतर तो सेन्सॉरच्या कात्रीतून सुटला. हा चित्रपट पक्षाच्या प्रसारासाठी नसल्याचं खासदार आणि निर्माते संजय राऊत यांनी स्पष्ट केलं. ठाकरे चित्रपट 25 जानेवारीला देशभरात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात नवाझुद्दीन सिद्दीकीनं बाळासाहेबांची भूमिका साकारली आहे. तर अमृता राव मीनाताई ठाकरेंच्या भूमिकेत दिसणार आहे.