शिवसेना नगरसेवकांची जाणार ‘टूर’

By admin | Published: May 25, 2016 02:16 AM2016-05-25T02:16:32+5:302016-05-25T02:16:32+5:30

विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीचा प्रचार जोर धरू लागला असून शिवसेना आणि राष्ट्रवादीने मतांची जुळवाजुळव करण्यास सुरुवात केली आहे. निवडणुकीच्या

Shiv Sena corporator goes 'Tour' | शिवसेना नगरसेवकांची जाणार ‘टूर’

शिवसेना नगरसेवकांची जाणार ‘टूर’

Next

ठाणे : विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीचा प्रचार जोर धरू लागला असून शिवसेना आणि राष्ट्रवादीने मतांची जुळवाजुळव करण्यास सुरुवात केली आहे. निवडणुकीच्या काळात कोणताही दगाफटका होऊ नये म्हणून शिवसेनेने आपल्या नगरसेवकांना ‘टूर’वर नेण्याचा निर्णय घेतला आहे.
२७ मेनंतर या नगरसेवकांना बाहेरगावी नेण्यात येईल आणि थेट ३ जून रोजी म्हणजेच मतदानाच्या दिवशीच ते मतदान केंद्रावर हजर होतील. बहुजन विकास आघाडीने (बाविआ) डावखरे यांना स्पष्ट पाठिंबा दिला आहे. सध्या सुमारे ७० मतांची आघाडी असल्याचा दावा शिवसेनेच्या नेत्यांकडून केला जात आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या उमेदवाराला विजयी करण्याचे फर्मान काढले आहे. मतदारांना महाबळेश्वरला पाठविण्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून इतर ठिकाणांचीही चाचपणी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: Shiv Sena corporator goes 'Tour'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.