...तर आता आमच्या स्टाईलने चोप देऊ; 'खळ्ळ-खॅटक'वाल्या मनसेला शिवसेनेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2020 11:07 AM2020-08-03T11:07:23+5:302020-08-03T12:15:58+5:30

शिवसेनेचे नगरसेवक आणि स्थायी समिती सदस्य महेश गायकवाड यांनी फेसबुकला व्हिडिओ शेअर करुन मनसेला इशारा दिला आहे.

Shiv Sena corporator Mahesh Gaikwad has given a warning to MNS | ...तर आता आमच्या स्टाईलने चोप देऊ; 'खळ्ळ-खॅटक'वाल्या मनसेला शिवसेनेचा इशारा

...तर आता आमच्या स्टाईलने चोप देऊ; 'खळ्ळ-खॅटक'वाल्या मनसेला शिवसेनेचा इशारा

googlenewsNext

मुंबई: मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना पोलिसांकडून २ वर्ष हद्दपार होण्याची नोटीस बजावली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अविनाश जाधव विविध प्रश्नांवर आंदोलन करुन सरकारवर टीकास्त्र सोडत आहे. ठाणे महापालिकेच्या कोविड रुग्णालयात नर्स म्हणून काम करणाऱ्या मुलींना काढल्याप्रकरणी मनसेकडून शुक्रवारी ठाणे महापालिकेसमोर आंदोलन सुरु होतं. हे आंदोलन करत असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते. यानंतर न्यायालयाने अविनाश जाधव यांना ३ ऑगस्टपर्यत पोलीस  कोठडी राहण्याचे आदेश दिले आहे. अविनाश जाधव यांना अटक झाल्यानंतर या अटकेमागे शिवसेनेचे नेते आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे पोलिसांवर दबाव टाकत असल्याचा आरोप मनसेकडून करण्यात येत आहे. मात्र मनसेच्या या आरोपानंतर आता शिवसेनेकडूनही प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

तडीपारीची नोटीस आलेल्या अविनाश जाधव यांना राज ठाकरेंनी पाठवला खास निरोप; म्हणाले..

शिवसेनेचे नगरसेवक आणि स्थायी समिती सदस्य महेश गायकवाड यांनी फेसबुकला व्हिडिओ शेअर करुन मनसेला इशारा दिला आहे. महेश गायकवाड म्हणाले की, पालकमंत्र्याच्या विरोधात टीका केली तर शिवसेना स्टाईलने चोप देऊ. सध्या कोरोना संकट असल्याने शिवसैनिक संयम ठेवून आहेत. पण याचा अर्थ तुम्ही काहीही बोलाल आणि सहन करू असे नाही. या पुढे जर टीका केलीत तर आता शिवसेना स्टाईलने चोप देऊ, असा इशारा महेश गायकवाड दिला आहे. त्यामुळे ठाण्यातील मनसे आणि शिवसेनेचा वाद चिघळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पालकमंत्र्यानी कोल्हापूर, सांगलीचा पूर असो किंवा आता आलेले कोरोना संकट असो, अशा प्रत्येक वेळी आपला जीव धोक्यात घालून काम केल आहे. त्यांना कुणाच्या पोचपवतीची गरज नाही, असं देखील महेश गायकवाड यांनी सांगितले आहे.

Dr Aishaचा कोरोनामुळे मृत्यू?; जाणून घ्या 'त्या' व्हायरल फोटो, व्हिडिओमागचं सत्य

दरम्यान, ठाणे महापालिकेसमोर आंदोलन करताना अविनाश जाधव यांना पोलिसांनी तडीपारीची नोटीस बजावली होती. या नोटीसनंतर अविनाश जाधव म्हणाले की, याबाबत बोलताना अविनाश जाधव म्हणाले की, मागची अनेक वर्ष लोकांसाठी आंदोलन करतोय, स्वत:साठी आंदोलन केले नाही, आजही विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातून आलेल्या मुलांसाठी ठाणे महापालिकेसमोर आंदोलन करताना त्यांना ही नोटीस प्राप्त झाली आहे. या नोटिशीमध्ये मुंबई, ठाणे, ठाणे ग्रामीण, नवी मुंबई, रायगड या जिल्ह्यातून हद्दपार होण्यासं सांगितलं आहे. जिल्ह्यात इतके गुंड आहेत त्यांना अशी नोटीस कधी बजावली नाही, लोकांसाठी आंदोलन करताना अशाप्रकारे दबाव आणण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात आहे असा आरोप त्यांनी केला. 

तसेच माझ्या सुरुवातीच्या सभेत मी म्हटलं होतं मला पोलीस तडीपारीची नोटीस बजावतील, आज ती नोटीस मला मिळाली. लोकांसाठी भांडायचं नाही का? लोकांसाठी आंदोलन करताना तडीपारीची नोटीस हे महाराष्ट्र सरकारचं बक्षीस आहे, कोकणासाठी मोफत बस सोडणार म्हणून हे बक्षीस आहे, लोकांचे, पोलिसांच्या समस्या प्रखरतेने मांडले त्याचं हे बक्षीस आहे. त्यामुळे यापुढे लोकांसाठी कोणी रस्त्यावर उतरायचं की नाही हे लोकांनी ठरवावं. नोटीस आली म्हणून थांबणार नाही तर लोकांना न्याय देण्याचं काम करणारच असंही अविनाश जाधव यांनी म्हटलं आहे.



आणि शेवटी मला तडीपारीची नोटीस आली...

Posted by Avinash Jadhav MNS on Friday, 31 July 2020

Web Title: Shiv Sena corporator Mahesh Gaikwad has given a warning to MNS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.