ऐन वादळात शिवसेना नगरसेवक रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:07 AM2021-05-19T04:07:31+5:302021-05-19T04:07:31+5:30
मुंबई-तौक्ते चक्रीवादळाचे पडसाद आज मुंबईसह पश्चिम किनारपट्टीवर बघायला मिळाले. अफाट वेगाने सुसाट वाहणारे वारे आणि अतिवृष्टी यांमुळे आज दिवसभर ...
मुंबई-तौक्ते चक्रीवादळाचे पडसाद आज मुंबईसह पश्चिम किनारपट्टीवर बघायला मिळाले.
अफाट वेगाने सुसाट वाहणारे वारे आणि अतिवृष्टी यांमुळे आज दिवसभर नागरिकांना अनेक अडचणी आल्या. १५ ते २० घरांचे नुकसान झाले, २५ ते ३० ठिकाणी झाडे कोलमडून पडली. तसेच इतर साधनसामग्री उदा. विजेचे आणि नेटवर्कचे खांब, कमकुवत वस्तू हे वाऱ्याने अक्षरशः कोसळले.
या कठीण काळात दहिसर येथील प्रभाग क्रमांक ३ चे नगरसेवक बाळकृष्ण ब्रीद हे आपल्या कर्तव्याची जाण ठेवून त्यांच्या कार्यकर्त्यांसह विभागातील विविध ठिकाणी फिरून चक्रीवादळाच्या मुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करत होते.
अनेक ठिकाणी कोलमडून पडलेली झाडे, खंडित झालेला विजेचा पुरवठा अनेक ठिकाणची वाहतूक कोंडी अशा अनेक समस्यांवर भर पावसात नगरसेवक ब्रीद हे त्यांच्या कार्यकर्त्यांसह उभे होते.
एवढेच नव्हे तर नागरिकांच्या झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून तलाठी प्रफुल्ल इंगळे यांच्या मार्फत कार्यालयातून नागरिकांना नुकसान भरपाई मिळावी यासाठीदेखील ब्रीद प्रयत्न करत आहेत.
"माझ्या प्रभागातील नागरिकांना घरात सुरक्षित राहता यावे यासाठी मी आणि माझे कार्यकर्ते आपला जीव धोक्यात घालून रस्त्यावर उतरून काम करत आहे असे ब्रीद यांनी सांगितले.
---#----------------------------------