Join us

सत्तालोभी आनंदीबाईंमुळे राघोबा खलनायक ठरले; अमृता फडणवीसांवर शिवसेनेचा 'बाण'

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2019 10:40 AM

अमृता फडणवीसांच्या टिकेला आता शिवसेनेनं देखील प्रत्युत्तर दिले आहे.

मुंबई : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस यांनी फक्त 'ठाकरे' आडनाव असून सुद्धा कोणी ठाकरे होऊ शकत नसल्याचे सांगत शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. अमृता फडणवीसांच्या टिकेला आता शिवसेनेनं देखील प्रत्युत्तर दिले आहे.

शिवसेनेचे नगरसेवक अमेय घोले यांनी इतिहासात रघुनाथदादा पेथवे हे बुद्धिमान, पराक्रमी असल्याचे सुरुवातीचे उल्लेख आहे. सत्तालोभी आनंदीबाईंनी त्यांची बुद्धी भ्रष्ट केली. त्यांनी नैतिकतेचाच मुडदा पाडला आणि राघोबा खलनायक ठरले. वर्तमानात इतिहास विसरायचा नसतो ठाकरे ठाकरेच असं म्हणत अमृता फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.

अमृता फडणवीस यांनी खरंय देवेंद्रजी, फक्त 'ठाकरे' आडनाव असून सुद्धा कोणी 'ठाकरे' होऊ शकत नाही. फक्त आपलं कुटुंब आणि सत्ता या पलिकडे जाऊन लोकांसाठी प्रमाणिकपणे काम करावं लागतं अशी टीका उद्धव ठाकरेंवर केली होती. 

माझं आडनाव गांधी आहे, सावरकर नाही त्यामुळे मी माफी मागणार नाही, असं काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी दिल्लीत झालेल्या काँग्रेसच्या मेळाव्यात म्हटलं होतं. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली होती. फक्त गांधी आडनाव असून चालत नाही. त्यासारखं काम करावं लागतं. त्यानुसार काम केलं तरच माणसं मोठी होतात, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.

राहुल गांधी यांच्या या विधानानंतर महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन करणाऱ्या आणि सावरकरांबाबत आग्रही भुमिका मांडणाऱ्या शिवसेनेला भाजपाने कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. सावरकरांविषयीची भुमिका शिवसेनेने स्पष्ट करावी, मुख्यमंत्रीपदासाठी लाचार झाले, राहुल गांधी यांचा निषेध करून दाखवाच, अशी आव्हाने भाजपाने शिवसेनेला दिली होती. त्याचवेळी हिवाळी अधिवेशन असल्याने उद्धव ठाकरेंना घेरण्याची रणनीती भाजपाने आखली होती. 

टॅग्स :उद्धव ठाकरेदेवेंद्र फडणवीसअमृता फडणवीसशिवसेनाभाजपाराहुल गांधीकाँग्रेसमहाराष्ट्र सरकार