शिवसेनेचं देवेंद्र फडणवीसांवर टीकास्त्र; तुम्ही छुप्या पद्धतीने काय केले ते आधी सांगा, मग...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2020 09:42 AM2020-01-21T09:42:44+5:302020-01-21T09:52:23+5:30

केवळ 122 आमदारांच्या जोरावर तेव्हा आपण सत्ता स्थापन केली तेव्हा कोणते अदृश्य हात आपल्या मागे होते ते आधी सांगा

Shiv Sena criticizes Devendra Fadnavis; Tell me what you did in secret, then ... | शिवसेनेचं देवेंद्र फडणवीसांवर टीकास्त्र; तुम्ही छुप्या पद्धतीने काय केले ते आधी सांगा, मग...

शिवसेनेचं देवेंद्र फडणवीसांवर टीकास्त्र; तुम्ही छुप्या पद्धतीने काय केले ते आधी सांगा, मग...

Next
ठळक मुद्देशिवसेना स्वतंत्र राजकीय पक्ष आहेशिवसेनेनेआपला स्वतंत्र बाणा जपून राजकीय सोयरीक करण्याचा प्रयत्न केला ही असला तर त्यात वावगे काय? २०१४ मध्ये युती शिवसेनेने नाही तर भाजपनेच तोडली होती

मुंबई - काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या विधानानंतर राज्यात शिवसेना-भाजपात शाब्दिक हल्ले सुरु झालेत. २०१४ निवडणूक निकालानंतर शिवसेनेने काँग्रेसला सत्तास्थापनेचा प्रस्ताव पाठवला होता असा दावा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. त्यावर शिवसेनेचा खरा उघड झाला असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. 

यावरुन आता शिवसेना-भाजपा नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु झालेत. उद्धव साहेबांच्या नेतृत्वात शिवसेनेने जे केले ते खुलेआम केले. आपल्याच युतीतील सहकारी पक्षातील लोकांचे आणि आपल्याच पक्षातील नेत्यांचे छुप्या पद्धतीने खच्चीकरण करण्याचे कारनामे कधी उद्धव ठाकरेंनी केले नाहीत असा पलटवार शिवसेना प्रवक्ता आमदार डॉ मनीषा कायंदे यांनी केला आहे. 

यावेळी बोलताना मनिषा कायंदे म्हणाल्या की, २०१४ मध्ये युती शिवसेनेने नाही तर भाजपनेच तोडली होती. २०१४ च्या लोकसभेत मोदी लाटेनंतर विधानसभा निवडणुकीत शिवसेनेशी भाजपने युती तोडली , आपल्या नेतृत्वात एकनाथ खडसे यानी युती तुटल्याची घोषणा केली होती, भाजपा शिवसेना वेगवेगळे लढले आणि सर्व शक्तिमान भाजपाला तेव्हाही बहुमत मिळाले नव्हतेच, केवळ 122 आमदारांच्या जोरावर तेव्हा आपण सत्ता स्थापन केली तेव्हा कोणते अदृश्य हात आपल्या मागे होते ते आधी सांगा असा टोला शिवसेनेने देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे. 

तसेच शिवसेना स्वतंत्र राजकीय पक्ष आहे तेव्हा भाजपा जर 2014 मध्ये राष्ट्रीय स्तरावर पूर्ण बहुमतात सत्तेत आल्यावर सतत शिवसेनेचे खच्चीकरण करू पाहत आहे हे लक्षात आल्यावर शिवसेनेने आपला स्वतंत्र बाणा जपून राजकीय सोयरीक करण्याचा प्रयत्न केला ही असला तर त्यात वावगे काय? असा सवाल करत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेनेने जे केले ते खुले आम केले आपल्याच युतीतील सहकारी पक्षातील लोकांचे आणि आपल्याच पक्षातील नेत्यांचे छुप्या पद्धतीने खच्चीकरण करण्याचे कारनामे कधी केले नाहीत असा आरोप शिवसेना आमदार मनिषा कायंदे यांनी देवेंद्र फडणवीसांवर केला. 

महत्त्वाच्या बातम्या

Video: मोदी छत्रपती शिवाजी तर शहा तानाजींच्या रुपात; ट्वविटरवरील 'त्या' व्हिडीओमुळे संताप

काश्मीरला जाणारे मंत्री 'डरपोक', मणिशंकर अय्यर यांचा भाजपावर हल्लाबोल

भाजपाला मोठा धक्का; शिवसेनेनंतर आणखी एका पक्षाने 21 वर्षांची साथ सोडली

महाधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मनसे नेत्याची 'गावरान' साद; अळूचं फदफदं की ठेचा अन् भाकरी...

नाइटलाइफसाठी मुंबईतील परिसरांची यादी करण्याची तयारी; आदित्य ठाकरेंचे स्वप्न पूर्ण होणार?

Web Title: Shiv Sena criticizes Devendra Fadnavis; Tell me what you did in secret, then ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.