Shiv Sena Dasara Melava: दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदेंचाच आवाज घुमला; गाठली 'इतकी' पातळी...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2022 08:55 PM2022-10-06T20:55:13+5:302022-10-06T20:56:42+5:30

दसरा मेळाव्यात कोणाचा आवाज जास्त होता, याबाबत एक रिपोर्ट समोर आली आहे.

Shiv Sena Dasara Melava: CM Eknath Shinde and Uddhav Thackeray noise levels at dasara melava | Shiv Sena Dasara Melava: दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदेंचाच आवाज घुमला; गाठली 'इतकी' पातळी...

Shiv Sena Dasara Melava: दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदेंचाच आवाज घुमला; गाठली 'इतकी' पातळी...

googlenewsNext

Shiv Sena Dasara Melava: काल(5 ऑक्टोबर) देशभरात दसरा सण मोठ्या उत्साहात पार पडला. पण, राज्यात चर्चा होती फक्त दसरा मेळाव्यांची. पहिल्यांदाच मुंबईत शिवसेनेचे दोन दसरा मेळावे झाले. एक मेळावा उद्धव ठाकरेंचा(Uddhav Thackeray), तर दुसरा एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा. संपुर्ण राज्याचे लक्ष या दोन्ही दसरा मेळाव्यांवर होते. मेळाव्यात मोठा आवाज नेमका कोणाचा होता, ठाकरेंचा की शिंदेंचा? याची माहिती आता समोर आली आहे.

ठाकरेंच्या मेळाव्याचा आवाज सर्वाधिक
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्याचा आवाज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मेळाव्यापेक्षा जास्त असल्याचा निष्कर्ष आवाज फाऊंडेशनने काढला आहे. आवाज फाउंडेशनने याबाबत एक रिपोर्टही जारी केली आहे. त्यानुसार शिवाजी पार्कच्या मेळाव्यात 101.6 डेसिबल इतका आवाज होता, तर बीकेसी मेळाव्यात 88 डेसिबल इतका आवाज नोंदवला गेला आहे.

एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंना वरचढ
उद्धव ठाकरेंच्या मेळाव्याचा आवाज जास्त असला, तरीदेखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंना वरचढ ठरले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या आवाजाची पातळी ही 88.4 डेसिबल होती आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आवाजाची पातळी 89.6 डेसिबल नोंदवण्यात आली आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्यात किशोरी पेडणेकर यांचा आवाज सर्वाधिक नोंदवला गेला. त्यांच्या भाषणावेळी 97 डेसिबलपर्यंत आवाज गेला होता. तसेच, एकनाथ शिंदे यांच्या मेळाव्यात सर्वाधिक आवाज खासदार धैर्यशील माने यांचा 88.5 डेसिबल नोंदवला गेला. 


 

 

Web Title: Shiv Sena Dasara Melava: CM Eknath Shinde and Uddhav Thackeray noise levels at dasara melava

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.