Join us

शिवसेनेतील मतभेद चव्हाटय़ावर

By admin | Published: December 12, 2014 1:02 AM

महापालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर नवी मुंबईतील शिवसेना पदाधिका:यांमधील मतभेद चव्हाटय़ावर येऊ लागले आहेत.

नवी मुंबई : महापालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर नवी मुंबईतील शिवसेना पदाधिका:यांमधील मतभेद चव्हाटय़ावर येऊ लागले आहेत. नेरूळमध्ये नुकत्याच झालेल्या बैठकीत शहर प्रमुख व माजी विरोधी पक्षनेते यांच्यामध्ये खडाजंगी झाली. नगरसेवकाचे त्यांच्या प्रभागामधील पदाधिका:यांबरोबरही वाद झाल्याचे स्पष्ट झाले आहे. 
विधानसभा निवडणुकीमध्ये झालेल्या पराभवानंतर शिवसेना पदाधिका:यांनी महापालिका निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. जिल्हा प्रमुख विजय चौगुले व उपनेते विजय नाहटा यांनी विभागनिहाय कार्यकत्र्याच्या बैठका सुरू केल्या आहेत. कार्यकत्र्याना पुढील तीन महिन्यांमध्ये काय करायचे याविषयी माहिती दिली जात आहे. परंतु या बैठकांमधून पक्षांतर्गत असलेला असंतोष बाहेर पडू लागला आहे. नेरूळमध्ये झालेल्या बैठकीमध्ये नगरसेवक रतन मांडवे व त्यांच्या प्रभागामधील एका पदाधिका:यामध्ये जोरदार खडाजंगी झाली. दोघांनी एकमेकांच्या कार्यशैलीवर टीका केली होती. उपनेते विजय नाहटा व इतर पदाधिका:यांनी त्यांची समजूत घातली. यानंतर शहर प्रमुख विजय माने व माजी विरोधी पक्षनेते दिलीप घोडेकर यांच्यामध्येही भांडण झाले. दोघांनी एकमेकांवर तोंडसुख घेतले. माने यांनी आवाज वाढविल्यामुळे तुम्ही गप्प बसा, तुम्हाला शाखाप्रमुख करण्यासाठी मी पाठपुरावा केला आहे. तुम्ही मला शिकवू नका असे सुनावल्याचे एका नगरसेवकाने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. 
शिवसेनेच्या पदाधिका:यांमधील ही नाराजी नवीन नाही. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान जिल्हा प्रमुख विजय चौगुले व उपजिल्हा प्रमुख मनोहर गायखे यांच्यामध्ये भांडण झाले होते. काही महिन्यांपूर्वी एका शहर प्रमुखाने त्यांच्याच प्रभागामधील नगरसेवकाच्या कानाखाली मारली होती. लोकसभा निवडणुकीनंतर सीवूड परिसरामध्येही एका पदाधिका:याच्या दुस:या पदाधिका:याने कानाखाली वाजविली होती. 
 
च्याबाबत बेलापूर मतदारसंघाचे 
संपर्क प्रमुख विठ्ठल मोरे म्हणाले, नेरूळमधील बैठकीत पदाधिका:यांत भांडणो झालेली नाहीत, किरकोळ मतभिन्नता होती, ती गांभीर्याने 
घेण्याची गोष्ट नाही. पक्षात कोणताही 
वाद नाही. काही पदाधिका:यांत मतभिन्नता असू शकते. 
 
च्शिवसेना आक्रमक संघटना असल्याने बैठकीत पदाधिकारी त्यांचे मत आक्रमकपणो मांडतात. पक्षात काम करण्यासाठी स्पर्धा आहे. या स्पर्धेचे आम्ही स्वागत करीत असून, संघटना एकसंघपणो चांगले काम करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.