Join us

मुंबईत लोढांनी बांधलेल्या कबूतरखान्यावर शिवसेनेनं चालवला हातोडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2018 20:50 IST

जागतिक वारसा यादीत असलेल्या गिरगाव चौपाटीवर कोणत्याही प्रकारचे बांधकाम करण्यास मनाई आहे. तरीही या ठिकाणी भाजपा आमदार मंगलप्रभात लोढा यांच्यामार्फत कबूतरखाना बांधण्यात आला आहे.

मुंबई - जागतिक वारसा यादीत असलेल्या गिरगाव चौपाटीवर कोणत्याही प्रकारचे बांधकाम करण्यास मनाई आहे. तरीही या ठिकाणी भाजपा आमदार मंगलप्रभात लोढा यांच्यामार्फत कबूतरखाना बांधण्यात आला आहे. यापूर्वी ऑक्टोबर 2017 मध्ये या कबुतरखान्यावर शिवसेनेच्या तक्रारीनंतर कारवाई करण्यात आली होती. मात्र पुन्हा याच ठिकाणी दुस-यांदा बांधण्यात आलेला कबूतरखाना महापालिकेने आज जमीनदोस्त केला. मात्र या कारवाईमुळे शिवसेना आणि भाजपामध्ये पुन्हा वाद पेटण्याची चिन्हे आहेत.या कबूतरखान्याला शिवसेनेचा विरोध आहे. शिवसेना विभाग प्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी या बेकायदा बांधकामाबाबत अनेकदा तक्रारी केल्या होत्या. गेल्या वर्षी शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत आणि अनिल देसाई यांच्या सूचनेनंतर महापालिकेने तात्काळ कारवाई करीत हा कबूतरखाना पाडला होता. मात्र पुन्हा त्याच ठिकाणी कबूतरखाना बांधण्यात आला. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पालिकेने आज तोडक कारवाई केली आहे.

टॅग्स :कबुतरमुंबई