मुंबई : धारावी विधानसभा मतदारसंघात कॉंग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी सलग चौथ्यांदा विजय मिळवला. शिवसेनेचे उमेदवार आशिष मोेरे यांनी त्यांच्यासमोर चांगली लढत दिली. मात्र शिवसेनेतील स्थानिक पातळीवरील अंतर्गत संघर्षामुळे मोरे यांना विजय मिळवण्यासाठी अडथळ्यांच्या शर्यतीला सामोरे जावे लागले. त्यामुळे त्यांना पराभव पत्करावा लागला.
२००४ पासून सलग आमदार असल्याचा लाभ निश्चितपणे गायकवाड यांना झाला. त्यांनी निवडणुकीची तयारी फार पूर्वीपासून केली होती. त्या तुलनेत शिवसेनेच्या उमेदवारीबाबत शेवटपर्यंत घोळ घालण्यात आला. उमेदवारी जाहीर करण्यात झालेल्या विलंबाचा फटका शिवसेनेला बसला. मोरे यांची उमेदवारी अंतिम टप्प्यात जाहीर करण्यात आली. मात्र निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्यांपैकी काही जणांनी उत्स्फूर्तपणे उमेदवाराला मदत केली नाही.
मोरे यांनी प्रचार करण्यासाठी चांगले नियोजन केले होते मात्र शिवसैनिकांची पुरेशी साथ मिळाली नाही. भाजपच्या कार्यकर्त्यांकडून शिवसेनेला पुरेशी मदत करण्यात आली नसल्याचा आरोप शिवसैनिकांकडून करण्यात आली. २०१४ मध्ये शिवसेना व भाजपच्या दोन्ही उमेदवारांची बेरीज गायकवाड यांच्या मतांपेक्षा जास्त होती मात्र यंदा तेवढी मते मिळवण्यात पक्षाला अपयश आले.
एमआयएमने माजी नगरसेवक मनोज संसारे यांना उमेदवारी दिली होती. त्यांना मुस्लिम व दलित समाजाचा चांगला प्रतिसाद मिळाला त्यांनी १३०९९ मते मिळवली. मात्र त्याचा गायकवाड यांच्या विजयामध्ये फरक पडला नाही. गायकवाड यांना ५३९५४ मते मिळाली तर मोरे यांना ४२१३० मते मिळाली गायकवाड ११८२४ मताधिक्याने विजयी झाल्या. २०१४ मध्ये शिवसेना व भाजप स्वतंत्र लढलेले असताना गायकवाड १५३२८ मताने विजयी झाल्या होत्या. शिवसेनेतील स्थान्ि