मुंबई- मुंबईतील रस्त्यांच्या कामावरुन आज माजी मंत्री आमदार आदित्य ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप केले. बीएमसीतील रस्त्यांच्या कामाच्या निविदा प्रक्रियेवर आदित्य ठाकरे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. या प्रकरणी ठाकरे यांनी इक्बाल चहल यांना पत्र लिहिले आहे.
आमदार आदित्य ठाकरे म्हणाले, 'तुम्ही मुंबईकरांचा पैसा वापरुन जे रस्ते एका वेगळ्या पद्धतीने बनवत आहात, यासाठी माझे दहा प्रश्न आहेत याची तुम्ही उत्तर द्या.
आदित्य ठाकरेंचे १० रोखठोक सवाल
१) ४०० किलोमीटरचे रस्ते आहे, हे तुम्हाला कोणी सांगितले. यासाठी तुम्हाला प्रपोजल कोणी दिले?
२) लोकशाही मध्ये ४०० किलोमीरचे रस्त्याचे एवढं मोठं काम, सहा हजार कोटीच काम एका प्रशासकाने मंजूरी देणे, म्हणजे स्वत:च प्रपोज देणे आणि स्वत:च मंजूरी देणे हे योग्य आहे का?
३) साडे सहा हजार कोटी रुपये फंड बजेटमध्ये कसा दाखवणार?
४) ४०० किलोमीटरच्या रस्त्याच्या कामासाठी कालावधी दिला आहे का?
५) जो किलोमीटरचा रस्ता १० कोटी रुपयांना व्हायचा तोच रस्ता आता १७ कोटी रुपयांना होणार आहे, एसओआर २० टक्क्यांनी का वाढवला?
६) एसओर कॉन्ट्रक्टर बदलतात का?
७) जास्त कॉक्रेटीकरण चांगले नाही, ते परवडणारे नाही, मुंबईचा जोशी मठ झाला तर याला जबाबदार कोण?
८) काम दिलेल्या कॉन्ट्रक्टरांना मुंबईत काम केल्याचा अनुभव आहे का?
९) आयआयटी सारख्या संस्थेकडून अहवाल घ्यायचा असतो, ४०० किलोमीटर रस्स्त्यांसाठी असा अहवाल घेतला आहे का?
१०) देशात पाचच कॉन्ट्रक्टर आहेत का? देशात एवढे मोठे फक्त पाच कॉन्ट्रक्टर आहेत का?
आता दुपारपर्यंत बीएमसीकडून एक पत्रक येईल. त्यात गोडगोड लिहून येईल.सर्व पक्षांना हे पटणारे आहे का? आम्ही अजुनही यासाठी आंदोलने केलेली नाही. पण, मी सर्वच पक्षांना आपील करतो, ही गद्दारांची टोळी येऊन हात मारुन जातील पण आपल्याला लाँग टर्मचे यांनी बिघडवू नये. आपल्या महापालिकेची आर्थिक परिस्थिती चांगली आहे, हे सगळ असताना आता सुरू असलेल्यामुळे महापालिकेची एफडी तोडावी लागेल, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.
कधीही जे आतापर्यंत घडले नाही, ते आता घडत आहे, ते तुम्हाला पटणारे आहे का? असा सवालही आदित्य ठाकरे यांनी केला.