४० गद्दारांनी सरकार पाडलं म्हणून फॉक्सकॉन प्रकल्प मागे राहिला; आदित्य ठाकरे आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2022 04:33 PM2022-09-14T16:33:47+5:302022-09-14T17:34:26+5:30

माजी मंत्री आणि शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी आज पुन्हा पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर टीका केली.

Shiv Sena leader Aditya Thackeray today again criticized the state government over the Foxconn project | ४० गद्दारांनी सरकार पाडलं म्हणून फॉक्सकॉन प्रकल्प मागे राहिला; आदित्य ठाकरे आक्रमक

४० गद्दारांनी सरकार पाडलं म्हणून फॉक्सकॉन प्रकल्प मागे राहिला; आदित्य ठाकरे आक्रमक

Next

मुंबई- वेदांता-फॉक्सकॉन ग्रुपचा १ लाख ५४ हजार कोटींचा प्रकल्प गुजरातला गेला आहे. या प्रकल्पातून १ लाख नोकऱ्या उपलब्ध होणार होत्या. सेमीकंडक्टर निर्मितीचा (vedanta semiconductor) हा प्रकल्प गुजरातला स्थापन करण्यासंदर्भात वेदांत-फॉक्सकॉन ग्रुप आणि गुजरात सरकारमध्ये करार झाला आहे. 

महाराष्ट्रात सत्ताबदल झाल्यानंतर २६ जुलै २०२२ रोजी नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या कंपनीबरोबर या प्रकल्पाबाबत चर्चा केली होती. मात्र, त्यानंतर मंगळवारी कंपनीने अचानक हा प्रकल्प गुजरातला होणार असल्याचे जाहीर केले. या घडामोडीनंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांना लक्ष्य करत आहेत. 

फॉक्सकॉनपेक्षा तोडीस-तोड...! मोदींचा एकनाथ शिंदेंना शब्द; फोनवर झाली महत्वाची चर्चा

माजी मंत्री आणि शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी आज पुन्हा पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर टीका केली. फॉक्सकॉनबाबत व्हॉट्सअॅपवर खोटो मेसेज फिरवण्याचे काम सुरु आहे. मुख्यमंत्र्यांनी अद्याप सविस्तर उत्तर दिलं नाही. सरकारने खुलासाही केला नाही. प्रकल्प महाराष्ट्राबाहेर का गेला?, याचं उत्तर मिळालं नाही, असं आदित्य ठाकरे म्हणाले. तसेच ४० गद्दारांनी सरकार पाडलं म्हणून प्रकल्प मागे राहिला. हे घडलं तेव्हा मुख्यमंत्री गणेश दर्शनात व्यस्त होते. त्यामुळे आता तरुणांच्या बेरोजगारीची जबाबदारी कोण घेणार?, असा सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला आहे. 

फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून थेट गुजरातला; कंपनीच्या चेअरमन यांनी दिली मोजकीच प्रतिक्रिया

दरम्यान, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी देखील सदर प्रकरणावर एक महत्वाची माहिती दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात फोनवरुन चर्चा झाली. यावेळी वेदांता-फॉक्सकॉनच्या तोडीचा किंवा यापेक्षा मोठा प्रकल्प महाराष्ट्राला दिला जाईल, असं आश्वासन नरेंद्र मोदी यांनी एकनाथ शिंदे यांना दिलं. तसेच महाराष्ट्रातील बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्यासाठी केंद्र सरकार एकनाथ शिंदेंच्या पाठीशी ठामपणे उभा राहील, असं नरेंद्र मोदींनी फोनवर म्हटल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली. 

गुजरातनं फॉक्सकॉनला काय दिलं?, महाराष्ट्र इथे मागे पडला, नाहीतर ऑफर काही कमी नव्हती!

गुजरातची जमीन प्रकल्पासाठी अयोग्य- 

सदर प्रकल्पासाठी महाराष्ट्रातील तळेगावची साईट योग्य असल्याचा उल्लेख वेदांता-फॉक्सकॉनच्या अहवालमध्ये नमूद करण्यात आला आहे. तर  गुजरातमधील 'ढोलेरा'ची साईट प्रकल्पासाठी अयोग्य असल्याचाही उल्लेख या अहवालामध्ये आहे. वेदांता-फॉक्सकॉनच्या अधिकाऱ्यांनी काही महिन्यांपूर्वी या प्रकल्पाबाबत एक सर्व्हे केला होता. त्यावेळी त्यांनी जागेबाबत निरिक्षण करुन अहवाल सादर केला होता. त्यामध्ये सदर प्रकल्पाबाबत मत मांडलं होतं. 

Web Title: Shiv Sena leader Aditya Thackeray today again criticized the state government over the Foxconn project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.