'उद्धव ठाकरेंबाबत उलट-सुलट बोलाल, तर याद राखा'; चंद्रकांत खैरेंचा नारायण राणेंना इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2022 01:12 PM2022-09-24T13:12:52+5:302022-09-24T13:13:05+5:30
केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या टीकेला शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आता गटनेत्यांपर्यंत येऊन पोहोचले आहेत. त्याआधी मंत्र्यांनाही भेट द्यायचे नाहीत. आता मेळावा घेताय. तसेच उद्धव ठाकरे यांना केंद्रीय मंत्री अमित शाह यांचा मुंबई दौरा का भोवला?, अमित शाह हे देशाचे गृहमंत्री, ते कुठेही जातील, अशी टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केली होती.
खोका, गिधाडं बोलतात, उद्धव ठाकरेंच्यामागे ईडी लागणार; नारायण राणेंनी झोड झोड झोडपले
मराठी माणसाला हद्दपार करण्यामध्ये उद्धव ठाकरे यांचाच हात आहे, यांनी मराठी माणसाच्या हिताचं बोलू नये, गद्दारांना दूध पाजलं म्हणणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी सत्तेत असताना खोक्याच्या रुपात तूप खाल्लं, अशी टीकाही नारायण राणेंनी केली. तुम्ही शिवसेना पक्ष वाढीसाठी काही केलं का?, असा सवाल उपस्थित करत आयत्या बिळावर ते नागोबा आहेत, असा निशाणा नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर साधला.
नारायण राणेंच्या या टीकेला माजी खासदार आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरेंनी स्वर्गीय बाळासाहेबांच्या आशीर्वादाने तुम्हाला मोठं केलं आहे. उद्धव ठाकरेंविषयी उलट-सुलट बोलाल, तर याद राखा. तुमची शुगर आधीच वाढली आहे, ती अजून वाढू देऊ नका, असा इशारा चंद्रकांत खैरे यांनी दिला आहे.
एकनाथ शिंदे, भाजपाच्या केसाला जरी धक्का लागला, तर...; नारायण राणेंची उद्धव ठाकरेंना थेट धमकी
दरम्यान, मुंबईवर संकट येते तेव्हा केंद्र सरकार नेहमी महाराष्ट्राला मदत करते. अशी एकही नैसर्गिक आपत्ती नाही, तिकडून मदत येत नाही. हे कधी वाचतच नाहीत. मातृभूमीसाठी काय केलेत तुम्ही, मुंबईच्या भूमीवर राहणाऱ्या लोकांसाठी काय केले. मुंबईत दोन लाख भिकारी आहेत. काय केलेत यांच्यासाठी, मातोश्रीच्या आजुबाजुलाच पाच-सहा हजार भिकारी आहेत, असेही राणे म्हणाले.