Join us

'हमारे झमेलेमे तुम्हारा क्या काम है?'; राज ठाकरेंच्या पोस्टनंतर शिवसेनेचही प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2022 3:31 PM

शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद यांनी ट्विट करत राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. 

मुंबई- विधानसभेत विश्वासमत सिद्ध करण्याला अवघे काही तास उरले असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी रात्री मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे आघाडी सरकार कोसळले असून देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रिपदाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यांच्यासोबत बंडखोर शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे नवे उपमुख्यमंत्री असतील, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.  राज्यात घडलेल्या या घडामोडींवर पहिल्यांदाच मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी भाष्य केलं आहे.

एखादा माणूस ज्या दिवशी आपल्या नशिबालाच स्वत:चं कर्तृत्व समजू लागतो, त्या दिवसापासून त्याचा ऱ्हासाकडे प्रवास सुरु होता, असं राज ठाकरे यांनी ट्विटरद्वारे म्हटलं आहे.

राज ठाकरेंच्या या पोस्टनंतर आता शिवसेनेने देखील प्रत्युत्तर दिलं आहे. शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद यांनी ट्विट करत राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. 

दरम्यान, एकनाथ शिंदे आता मुंबईत दाखल झाले असून भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी दाखल झाले आहेत. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस राजभवनावर राज्यपालांची भेट घेतल्यानंतर पत्रकार परिषद घेणार आहेत. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे आज सायंकाळी शपथविधी घेणार आहे. शपथविधीची राजभवनावर जय्यत तयारी करण्यात आली आहे.

टॅग्स :राज ठाकरेदीपाली सय्यदमनसेशिवसेना