Join us

नावडतीचं मीठ आळणी, अमृता फडणवीसांवर शिवसेना नेत्याची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2021 4:33 PM

कोण अमृता फडणवीस? विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी का? नावडतीचं मिठ अळणी, अशी त्यांची अवस्था झाल्याचे किशोरी पेडणेकर यांनी म्हटले. तसेच आपल्याला त्यांच्याबद्दल जास्ती बोलायचं नाही, असं म्हणत त्यांनी विषयही टाळला.

ठळक मुद्देकोण अमृता फडणवीस? विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी का? नावडतीचं मिठ अळणी, अशी त्यांची अवस्था झाल्याचे किशोरी पेडणेकर यांनी म्हटले. तसेच आपल्याला त्यांच्याबद्दल जास्ती बोलायचं नाही, असं म्हणत त्यांनी विषयही टाळला.

मुंबई - राज्य सरकारच्या कामकाजावर आणि पुण्यातील मेट्रोच्या श्रेयावादावर अमृता फडणवीस यांनी जोरदार टीका केली. तसेच पुण्यातील कोरोना परिस्थितीवरुन निर्बंध न हटविण्याच्या मुद्द्यावरही त्यांनी भाष्य केलं. अमृता फडणवीस यांनी केलेल्या टीकेसंदर्भात मुंबईच्या महापौर आणि शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना, नावतडीचं मीठ आळणी अशी टीका त्यांनी अमृता फडणवीस यांच्यावर केली आहे. 

कोण अमृता फडणवीस? विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी का? नावडतीचं मिठ अळणी, अशी त्यांची अवस्था झाल्याचे किशोरी पेडणेकर यांनी म्हटले. तसेच आपल्याला त्यांच्याबद्दल जास्ती बोलायचं नाही, असं म्हणत त्यांनी विषयही टाळला. मात्र, मोजक्याच शब्दात त्यांनी अमृता फडणवीस यांच्यावर टीकाही केला. दरम्यान, अमृता फडणवीस यांनी गुरूवारी पुण्यात एका कार्यक्रमाला हजेरी लावली. येथील धागा हॅन्डलूम महोत्सवाचं पुण्यात आयोजन करण्यात आलं असून, महोत्सवाचं उद्घाटन अमृता फडणवीस यांच्या हस्ते झालं. त्यानंतर, पत्रकारांशी बोलताना राजकीय विषयांवरही त्यांनी भाष्य केलं. तसेच, महाविकास आघाडी सरकारला टोलाही लगावला. 

अमृता फडणवीस यांची राज्य सरकारवर टीका

राज्य सरकारने 26 जिल्ह्यांमध्ये निर्बंध हटवले असून रात्री 8 वाजेपर्यंत दुकाने खुली करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, वगळण्यात आलेल्या 11 जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने पुण्याचा समावेश आहे. त्यामुळे, पुणेकर व्यापारी सरकारवर नाराज आहेत. त्या पार्श्वभूमीवर अमृता फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत प्रशासन व राज्य सरकारला प्रश्न विचारले आहेत. तसेच, महाविकास आघाडी सरकावरही टीका केली. सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजमध्ये महावसुली न झाल्यास पूरग्रस्तांना मदत पोहोचेल, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. 

टॅग्स :मुंबईशिवसेनाकोरोना वायरस बातम्याकिशोरी पेडणेकर