Join us

'नारायण राणे एका गुंडाप्रमाणे सुपारी घेऊन बोलताय'; किशोरी पेडणेकरांचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2022 7:44 PM

शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर टीका केली आहे.

मुंबई- माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आता गटनेत्यांपर्यंत येऊन पोहोचले आहेत. त्याआधी मंत्र्यांनाही भेट द्यायचे नाहीत. आता मेळावा घेताय. तसेच उद्धव ठाकरे यांना केंद्रीय मंत्री अमित शाह यांचा मुंबई दौरा का भोवला?, अमित शाह हे देशाचे गृहमंत्री, ते कुठेही जातील, अशी टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केली. नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरेंच्या भाषणाचा समाचार घेतला. 

खोका, गिधाडं बोलतात, उद्धव ठाकरेंच्यामागे ईडी लागणार; नारायण राणेंनी झोड झोड झोडपले

भाजपा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अन् सहकाऱ्यांच्या केसाला जरी धक्का लागला तर, महाराष्ट्रात तुम्हाला फिरु देणार नाही, असा इशारा नारायण राणे यांनी दिला. तसेच भाजपाच्या कोणत्याही नेत्यांवर टीका केली, तर जसास-तसे उत्तर देणार नाही, तर कायमचे बोलणं बंद करु, असा इशारा देखील नारायण राणेंनी यावेळी दिला. 

नारायण राणेंच्या या विधानावरुन आता शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी निशाणा साधला आहे. नारायण राणे केंद्रीय मंत्री आहेत. मात्र ते एका गुंडाप्रमाणे सुपारी घेऊन बोलत आहेत. प्रत्येक पक्षाचा पक्षप्रमुख आपल्या पक्षासमोर मांडणी करत असतो. त्यांना एवढी मिरची लागण्याची काय गरज?, असा सवाल किशोरी पेडणेकरांनी उपस्थित केला.  

एकनाथ शिंदे, भाजपाच्या केसाला जरी धक्का लागला, तर...; नारायण राणेंची उद्धव ठाकरेंना थेट धमकी

दरम्यान, मराठी माणसाला हद्दपार करण्यामध्ये उद्धव ठाकरे यांचाच हात आहे, यांनी मराठी माणसाच्या हिताचं बोलू नये, गद्दारांना दूध पाजलं म्हणणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी सत्तेत असताना खोक्याच्या रुपात तूप खाल्लं, अशी टीकाही नारायण राणेंनी केली. तुम्ही शिवसेना पक्ष वाढीसाठी काही केलं का?, असा सवाल उपस्थित करत आयत्या बिळावर ते नागोबा आहेत, असा निशाणा नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर साधला. 

मुंबईत दोन लाख भिकारी-

मुंबईवर संकट येते तेव्हा केंद्र सरकार नेहमी महाराष्ट्राला मदत करते. अशी एकही नैसर्गिक आपत्ती नाही, तिकडून मदत येत नाही. हे कधी वाचतच नाहीत. मातृभूमीसाठी काय केलेत तुम्ही, मुंबईच्या भूमीवर राहणाऱ्या लोकांसाठी काय केले. मुंबईत दोन लाख भिकारी आहेत. काय केलेत यांच्यासाठी, मातोश्रीच्या आजुबाजुलाच पाच-सहा हजार भिकारी आहेत, असेही राणे म्हणाले.

टॅग्स :किशोरी पेडणेकरएकनाथ शिंदेनारायण राणे शिवसेना