Join us

योगी अन् भोगी संदर्भात अचानक मतपरिवर्तन कसं झालं?; संजय राऊतांचा राज ठाकरेंना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2022 11:31 AM

शिवसेनेचे नेते संजय राऊतांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यावर देखील टीका केली आहे.

मुंबई- लाऊडस्पीकरबाबत न्यायालयाच्या आदेशाचे पालन करावे, असे महाराष्ट्र सरकारने म्हटले आहे. राज्य गृह मंत्रालयाने सर्व पक्षांना बैठकीसाठी बोलावले होते. मात्र भाजपाने त्यास विरोध केला. याचा अर्थ तुम्हाला राजकारण करायचे आहे आणि लाऊडस्पीकरच्या मुद्द्यावरून राज्यात गोंधळ घालायचा आहे, अशी टीका शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केली. 

संजय राऊतांनी आज माध्यामांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलेत होते. संजय राऊतांनी मनसेप्रमुखराज ठाकरे यांच्यावर देखील टीका केली आहे. गुरुवारी राज ठाकरे यांनी उत्तरप्रदेशमधील भोंगे उतरविल्याबद्दल मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं कौतुक केलं होतं. यावर संजय राऊतांनी आज भाष्य केलं. 

राजकीय वातावरण तापण्याचा प्रयत्न सुरु आहे. ही भोंगेबाजी. आता योगी कोण? भोगी कोण? आणि हे योगी आणि भोगी संदर्भातील मतपरिवर्तन कसं झालं?, असं सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला आहे. तसेच हा संशोधनाचा विषय आहे. जर एखाद्या विद्यार्थ्याला यावर पीएचडी करायची असेल, तर ती त्यांनी करायला हवी. हा फार इंटरेस्टिंग विषय आहे, असं टोला संजय राऊतांनी राज ठाकरेंना लगावला आहे. 

राज ठाकरेंनी योगींच केलं कौतुक-

राज ठाकरेंनी घेतलेल्या भूमिकेचा थेट परिणाम उत्तर प्रदेशातही दिसून आला. येथील पोलिसांनी विविध प्रार्थनास्थळांवरील तब्बल 10,923 भोंगे उतरविण्यात आल्याचा दावा केला आहे. यूपीत भोंगे उतरवल्याबद्दल राज ठाकरे यांनी योगी सरकारचे कौतुक केलं आहे. तसेच महाराष्ट्रात सत्तेचे भोगी आहेत असं म्हणत ठाकरे सरकारला सणसणीत टोला लगावला. 

आमच्याकडे महाराष्ट्रात 'योगी' कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे 'भोगी'!" असं म्हणत ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. राज ठाकरे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "उत्तर प्रदेशातील धार्मिक स्थळांवरील, विशेषत: मशिदींवरील भोंगे उतरवल्याबद्दल योगी सरकारचे मन:पूर्वक अभिनंदन आणि आभार. आमच्याकडे महाराष्ट्रात योगी कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे भोगी! महाराष्ट्र सरकारला सदबुद्धी मिळो हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना, असं राज ठाकरे यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं.

टॅग्स :राज ठाकरेमनसेसंजय राऊतयोगी आदित्यनाथ