Join us

"काय चाललंय; इतर राज्याची सुरक्षा हवी असेल तर आपलं चंबू गबाळ आवरुन आपल्या राज्यात जावं"

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2020 5:23 PM

कंगना राणौतच्या या विधानावर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे.

मुंबई: बॉलिवू़ड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर उघडपणे बोलणारी अभिनेत्री कंगना राणौतने  मुंबई पोलिसांवरही अविश्वास दाखविणारे वक्तव्य केले आहे. भाजपाचे आमदार राम कदम यांनी एक ट्विट केले होते. त्यावर कंगनाने उत्तर देत मला बॉलीवूड माफियांपेक्षा मुंबई पोलिसांची भीती वाटत असल्याचे वक्तव्य केलं आहे. कंगना राणौतच्या या विधानावर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे.

तुकाराम मुंढेंच्या संघर्षाला सलाम... कुटुंब सांभाळण्यासाठी केली शेती; IAS होऊन भावाची 'स्वप्नपूर्ती'

संजय राऊत म्हणाले की, मुंबई पोलिसांवर अविश्वास तुम्ही दाखवताय. कोणाला इतर राज्याची सुरक्षा हवी असेल तर त्यांनी आपलं चंबू गबाळ आवरावे आपल्या राज्यात जावं. हा काय तमाशा चाललंय, अशी टीका संजय राऊत यांनी केली. राज्याच्या गृहमंत्र्यांनी यावर तातडीने उत्तर दिलं पाहिजे, मग ते कोणीही असेल. या राज्यावर, पोलिसांवर विश्वास नाही. तुम्ही इकडे मीठ खाताय, ही तर बेईमानी आहे. अशा व्यक्तींच्या मागे राजकीय पक्ष उभे राहत असतील तर हीसुद्धा मोठी बेईमानी आहे, असं संजय राऊत यांनी सांगितले.

Unlock 4: उद्धव ठाकरे लोकल, मेट्रो सुरु करण्याच्या विरोधात?; राज्यातील अनलॉक 4 च्या गाईडलाईन्स होणार जाहीर

सुशांत सिंग मृत्यू प्रकरणी अनेक प्रश्न उपस्थित करत बॉलिवूडच्या अनेक दिग्गजांवर आरोप करणाऱ्या कंगनाने आता थेट मुंबई पोलिसांवर आरोप केला आहे. भाजप नेते राम कदम यांच्या ट्वीटला उत्तर देताना कंगनाने आपल्याला मुंबई पोलिसांची जास्तचं भीती वाटते, असं ट्वीट केलं होतं. 'मला आता मुव्ही माफिया गुंडांपेक्षा मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटते. मला एकतर हिमाचल प्रदेश सरकार किंवा थेट केंद्राकडून सुरक्षा द्या, पण मुंबई पोलिसांकडून नको.' असं म्हणत तिने मुंबई पोलिसांवर अविश्वास जाहीरपणे व्यक्त केला होता. मात्र तिच्या या वादग्रस्त ट्विटवर नेटकऱ्यानी खरपूस समाचार घेतला आहे. फुकटच्या प्रसिद्धीसाठी काहीही बरगळू नकोस, मुंबई पोलिसांवर विश्वास नसेल तर मुंबईत महाराष्ट्रात राहू नकोस, येथून निघून जा, असा सल्ला देत तिचा निषेध केला आहे.

मला अनफॉलो का केलं जातय?- कंगना रणौत

माझे ट्विटर फॉलोअर्स गेल्या दिवसांत अचानक कमी होत आहेत. यामध्ये एक पॅटर्न असल्याचा संशय मला येतोय. दिवसाला 40 ते 50 हजार फॉलोअर्स कमी होत आहेत. मी ट्विटरवर नवीन आहे. यामागचे कारण मला माहित नाही. हे असे का होतेय कोणी सांगेल का? ते असे का करत आहेत, काही कल्पना आहे का? अशा आशयाचे ट्विट कंगनाने केले आहे. या ट्विटमध्ये तिने ट्विटर इंडियाला देखील टॅग केले आहे.  

अन्य महत्वाच्या बातम्या- 

गुंगीचं औषध देऊन १५ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार; वेश्याव्यवसायातही ढकलल्याची घटना

"सचिन सावंत तुम्ही नगरसेवक म्हणून फक्त एकदा निवडून या अन् उभं राहायचं धाडस दाखवा"

आदित्य टी कोण हे रियाला माहीत नाही, पण त्यांची इन्स्टा पोस्ट तिने लाईक केलीय; नितेश राणेंचा बाण

टॅग्स :संजय राऊतउद्धव ठाकरेमुंबई पोलीससुशांत सिंग रजपूतकंगना राणौत