मुंबई: आम्ही फोन, व्हिडीओ कॉन्फरन्सिंग आणि जिल्हा निहाय बैठकांद्वारे लोकांची मदत कशी करता येईल यावर लक्ष केंद्रित करत असून विरोधी पक्षातील काही मंडळी ही हेल्थ आणि डिझास्टर टुरिझमसाठी फिरत असल्याची टीका पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांवर केली होती. यानंतर मुख्यमंत्री ज्यांना योग्य वाटतं त्यांना ते मंत्री करु शकतात. पण मंत्री झाल्याने शहाणपण येतच असं नाही, असं प्रत्युत्तर देवेंद्र फडणवीसांनी दिलं आहे. तसेच 'नया है वह' असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरे यांना खोचक टोला देखील लगावला होता.
CoronaVirus News: पुणे, ठाण्यापाठोपाठ आता मुंबईतही लॉकडाऊन?; आयुक्तांनी दिली महत्त्वाची माहिती
देवेंद्र फडणवीसांच्या या विधानावरुन शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे. संजय राऊत म्हणाले की, देवेंद्र फडणवीस देखील नवीनच आहेत. तसेच तरुणांना संधी द्या,या मताचे खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय संरक्षणमंत्री अमित शहा देखील आहेत. नरेंद्र मोदी आणि अमित शहा देखील दिल्लीच्या राजकारणात नवीनच आहे. त्यांनी दिल्लीत उत्तम काम केलं आहे. मात्र त्यांना आम्ही कधी नया है वह असं म्हटलं का, असं संजय राऊत यांनी सांगितले.
देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची घेतलेली मुलाखत म्हणजे मॅच फिक्सिंग आहे, असं म्हटलं होतं. देवेंद्र फडणवीसांच्या या वक्तव्याचा देखील संजय राऊत यांनी समाचार घेतला आहे. तुमचीही वृत्तपत्रे आहेत. त्यामुळे शरद पवारांची देवेंद्र फडणवीस यांनी मुलाखत घ्यावी. बघूया शरद पवार तुम्हाला मुलाखत देतात की नाही आणि ती मुलाखत छापण्याची हिंमत दाखवणार का, असा सवाल देखील संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. त्याचप्रमाणे पुढील आठवड्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही 'सामना'मध्ये मुलाखत असून दिल्लीतील राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांच्या मुलाखती देखील लवकरच घेणार असल्याचे संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या-